आॅलिम्पिक तयारीसाठी सुशील अमेरिकेत

By admin | Published: September 4, 2015 10:54 PM2015-09-04T22:54:27+5:302015-09-04T22:54:27+5:30

खांद्याच्या दुखापतीमुळे विश्व कुस्ती स्पर्धेतून माघार घेणारा व दोनदा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार फिटनेससाठी व आॅलिम्पिकची तयारी करण्यासाठी

Sushil America to prepare for the Olympics | आॅलिम्पिक तयारीसाठी सुशील अमेरिकेत

आॅलिम्पिक तयारीसाठी सुशील अमेरिकेत

Next

नवी दिल्ली : खांद्याच्या दुखापतीमुळे विश्व कुस्ती स्पर्धेतून माघार घेणारा व दोनदा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशील कुमार फिटनेससाठी व आॅलिम्पिकची तयारी करण्यासाठी अमेरिकेत अडीच महिने कालावधीच्या सराव सत्रात सहभागी होणार आहे.
लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदकाचा मान मिळविणाऱ्या सुशील कुमारने सांगितले या महिन्याच्या मधल्या कालावधीत सरावासाठी अमेरिकेत जाणार आहे. सुशील म्हणाला,‘मी छत्रसाल स्टेडियममध्ये सराव सुरू केला आहे. मी या महिन्याच्या मधल्या कालावधीत अडीच महिन्यांसाठी सरावासाठी ट्रेनिंगला जाणार आहे. त्यासाठी मला क्रीडा मंत्रालय व भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून मंजुरी मिळालेली आहे.’ विश्व चॅम्पियनशिपमधील गत सुवर्णपदक विजेता सुशील कुमार म्हणाला,‘मी या कालावधीत कोलोराडो स्प्रिंग्स किंवा त्याच्या जवळच असलेल्या एक ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव करणार आहे. मी येथे स्पर्धेत सहभागी होणार असून फिटनेसची चाचणी घेणार आहे.’
येत्या ७ सप्टेंबरपासून अमेरिकेतील लॉस वेगासमध्ये प्रारंभ होत असलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाच्या तयारीबाबत बोलताना सुशील म्हणाला,‘भारतीय मल्लांनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सात-आठ दिवस छत्रसाल स्टेडियममध्ये कसून सराव केला. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर भारतातील जास्तीत जास्त मल्लांनी आॅलिम्पिकसाठी स्थान निश्चित करावे, अशी माझी इच्छा आहे. ’ या स्पर्धेत प्रत्येक वजन गटातील अव्वल सहा मल्लांना आॅलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करण्याची संधी आहे.
विश्व चॅम्पियनशिपमधून माघार घेण्याबाबत बोलताना सुशील म्हणाला,‘मी पूर्णपणे फिट नसल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली. फिटनेस नसताना स्पर्धेत सहभागी होणे म्हणजे दुसऱ्या चांगल्या खेळाडूवर अन्याय होत असतो. अन्य खेळाडूंना संधी मिळणे योग्य आहे.’ सुशीलचे गुरू महाबली सतपाल म्हणाले,‘आॅलिम्पिकला एक वर्षाचा कालावधी शिल्लक असल्यामुळे पात्रता मिळविण्यासाठी चुरस दिसून येत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sushil America to prepare for the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.