ही दुश्मनी संपायची नाय..

By admin | Published: July 8, 2014 02:03 AM2014-07-08T02:03:57+5:302014-07-08T02:03:57+5:30

या वर्ल्डकपसाठी अर्जेटिनातून हजारो पाठीराख्यांनी देशाची सीमा ओलांडून ब्राझील गाठलंय. यावर सध्या ब्राझीलमध्ये एक जोक खूपच हिट झालाय. ए

This is to suppress the hostility. | ही दुश्मनी संपायची नाय..

ही दुश्मनी संपायची नाय..

Next
संदीप चव्हाण
एक बात मैं समज गया हूं.. लडकी और रॉकेट आपको कही भी ले जा सकते है.. रांजना सिनेमातील हीरो, धनुष्यचा हा फेमस डायलॉग.  या डायलॉगमध्ये रॉकेटऐवजी फुटबॉल हा शब्द टाकला की, मग तुम्ही तो ब्राझीलियन्ससाठी वापरू शकता.. एखादी मुलगी तुमच्याकडे पाहून छानशी हसली म्हणून लगेच पागळायचं कारण नाही आणि ब्राझीलच्या फुटबॉल संघाविरोधात किंवा अर्जेटिनाच्या समर्थनात चकार शब्द काढायचा नाही. एवढं पथ्य पाळलं की, मग तुम्ही ब्राझीलमध्ये निर्धास्त भटकू  शकता..आणि म्हणूनच हे पथ्य पाळून रविवारच्या सुटीचा मुहूर्त गाठून मी ब्राझीलच्या साल्वाडोरसफरीला सुरुवात केली.. साल्वाडोर शहर अतिशय सुंदर..त्यात पेलोरिन्हो समुद्राच्या अगदी कडेला काहीशा टेकाडय़ावर वसलेलं.. अशा या सुंदर शहराबाबत, येथील एकूणच सौंदर्याबाबत (यात सर्व काही आलं.).. राजकारणाबाबत किंवा येथील वाढत्या गुन्हेगारीबाबत तुम्ही कशावरही कुणाशीही चर्चा करा. त्याचा शेवट हा फुटबॉलवरच होतो.. भारतात कसं क्रिकेटमध्ये एकवेळ आपण जिंकलो नाही तरी चालेल, पण पाकिस्तान जिंकता कामा नये. अगदी तीच दुश्मनी ब्राझील आणि अर्जेटिना संघांत आहे. दोन्ही संघांत सध्या घोषणायुद्ध अगदी कंबरेच्या खालच्या पातळीवर रंगलंय.. तुमच्या देशात येऊन वर्ल्डकप आम्ही घेऊन जाणार, माराडोना हा पेलेपेक्षा महान आहे.. अशा आशयाचं गाणं हे सध्या अर्जेटिनाचं जणू फुटबॉल अँथेम बनलंय.. कोपा अमेरिकन स्पर्धेत ब्राझीलच्या आठ विजेतेपदाच्या तुलनेत अर्जेटिनानं 14 विजेतेपद पटकावलीत. त्यामुळे लॅटिन अमेरिकेतील फुटबॉल वर्चस्वासाठी या दोन्ही देशांत जबरदस्त कांटे की टक्कर आहे. आतार्पयत उभय देशांत एकूण 95 मॅचेस झाल्या. त्यापैकी 36 अर्जेटिनाने, तर 35 ब्राझीलने जिंकल्यात. 24 मॅचेस ड्रॉ झाल्या. यावरून या दोन्ही देशांतील दुश्मनी लक्षात येईल. या वर्ल्डकपसाठी अर्जेटिनातून हजारो पाठीराख्यांनी देशाची सीमा ओलांडून ब्राझील गाठलंय. यावर सध्या ब्राझीलमध्ये एक जोक खूपच हिट झालाय. एक विदेशी नागरिक पोलीस ठाण्यामध्ये दाखल होतो. त्याच्यातील आणि पोलीस चीफमधील हा संवाद.. 
नागरिक - मला एक गुन्हा कबूल करायचाय. मी एका नागरिकाला गाडीनं उडवलंय. 
चीफ - तुला गंभीर स्वरूपाची शिक्षा होऊ शकते. 
नागरिक - ब्राझीलच्या सीमारेषेवर एक अर्जेटिनियन नागरिक सीमा ओलांडत होता तेव्हा माङयाकडून ही चूक झाली.
चीफ - मग तू मुळीच भिऊ नकोस, त्या अर्जेटिनियनची चूक असणार, वर्ल्डकपसाठी लोंढेच्या लोंढे येताहेत. त्यानेच वाहतुकीचे नियम पाळले नसणार.
नागरिक - नाही सर, तो रस्त्याच्या कडेला उभा होता.
चीफ - मग काय झालं याचा अर्थ तो रस्ता ओलांडणारच होता ना, तू नाही तर कुणीतरी त्याला उडवणारच होतं.
नागरिक - पण, सर मी गुन्हा दडपण्यासाठी बॉडी पुरलीय. 
चीफ- बघ किती माणुसकी आहे तुला. दुसरा कुणी असता तर ती बॉडी तशीच गिधाडांसाठी सोडून गेला असता..
नागरिक - तसं नाही चीफ पण मी त्याला पुरताना तो सारका ओरडत होता मी मेलो नाहीय..
चीफ - बघ, मी तुला सांगितलं ना.. अर्जेटिनियन खोटारडेच असतात.. मेल्यावरही खोटं बोलायची सवय जात नाही..
प्रत्येक ब्राझीलियन सध्या या जोक्समध्ये स्वत:ची आणखीन भर घालून अर्जेटिनियन्सवर उट्टे काढतोय.. 

 

Web Title: This is to suppress the hostility.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.