ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 21 - कोलकाता नाइटरायडर्सचा अव्वल फिरकी गोलंदाज  सुनील नारायणचा नवा अवतार यंदाच्या आयपीएलमध्ये पाहायला मिळत आहे. नारायणने आज पुन्हा एकदा सलामीस येत तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने  आयपीएलमध्ये एका हटके विक्रमाची नोंद केली. 
कोलाकात्याला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित करण्यात आल्यावर नारायणच्या खणखणीत फटक्यांसमोर गुजरातची गोलंदाजी खिळखिळी झाली. नारायणने केवळ 17 चेंडूत 42 धावा फटकावल्या.  विशेष म्हणजे त्याने या सर्व धावा चौकार आणि षटकारांच्या मदतीने कुटल्या. त्याने आपल्या या खेळीत 9 चौकार आणि 1 एक षटकार ठोकला. त्याबरोबरच नारायणने आयपीएलमध्ये केवळ षटकार आणि चौकारांच्या मदतीने सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम सनथ जयसूर्याच्या नावे होता. त्याने 36 धावा केवळ षटकार आणि चौकारांच्या मदतीने फटकावल्या.  
सुनील नारायणनने दिलेल्या धमाकेदार सुरुवातीनंतर रॉबिन उथप्पाने केलेल्या 72 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईटरायडर्सने आज आयपीएलमध्ये सुरू असलेल्या लढतीत गुजरात लायन्ससमोर 188 धावांचे आव्हान ठेवले होते.