द. अफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर, विंडिजला विजयासाठी हव्या ४०९ धावा

By admin | Published: February 27, 2015 01:01 PM2015-02-27T13:01:15+5:302015-02-27T13:01:15+5:30

डिव्हिलियर्सच्या झंझावातापुढे वेस्ट इंडिजची गोलंदाजीची धुळधाण उडाली आणि दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ४०९ धावांचे आव्हान ठेवले

The South Africa scored 409 runs for the loss of the West Indies | द. अफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर, विंडिजला विजयासाठी हव्या ४०९ धावा

द. अफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर, विंडिजला विजयासाठी हव्या ४०९ धावा

Next
>ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २७ - ए. बी. डिव्हिलियर्सच्या झंझावातापुढे वेस्ट इंडिजची गोलंदाजीची धुळधाण उडाली आणि दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ४०९ धावांचे आव्हान ठेवले. ४०८ ही आत्तापर्यंतची विश्वचछकातील दुस-या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाठलाग करून सामना जिंकण्याचा विक्रम याआधी ३३५ धावसंख्येचा आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला हा सामना जिंकण्यासाठी चमत्काराची गरज आहे. डिव्हिलियर्सने अवघ्या ६६ चेंडूंमध्ये गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १६२ धावा फटकावल्या. त्याने शेवटच्या षटकातच ३० धावांची लयलूट केली.
वेस्ट इंडिजची सुमार गोलंदाजी व ढिसाळ क्षेत्ररक्षण अफ्रिकेच्या पथ्यावर पडलं. गेल्या सामन्यात झिम्बाव्बेच्या समोर द्विशतक झळकावणारा ख्रिस गेल आज पुन्हा तशीच खेळी करतो का याकडे क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागले आहे. अमलाने ६५, ड्युप्लेसिसने ६२ धावा केल्या. होल्डरच्या १० षटकांमध्ये १०४ धावा काढण्यात आल्या.

Web Title: The South Africa scored 409 runs for the loss of the West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.