भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 05:01 PM2019-02-05T17:01:35+5:302019-02-05T17:02:46+5:30

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Smriti Manshana and Hima Das In the list of Forbes | भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा मान

भारताची शान स्मृती मानधना आणि हिमा दासला फोर्ब्सचा मान

Next

नवी दिल्ली : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणाऱ्या हिमा दास यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. फोर्ब्सने भारताची '30 अंडर 30' अशी एक यादी तयार केली आहे. या यादीमध्ये स्मृती आणि हिमा यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचाही या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

फोर्ब्स इंडियाच्या '30 अंडर 30' या आवृत्तीचे हे सहावे वर्ष आहे. या यादीमध्ये खेळाबरोबर एंटरटेनमेंट, मार्केटिंगसहित अन्य काही क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. या वर्षीच्या यादीमध्ये एकूण 16 क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. या यादीसाठी पहिल्यांदाच उद्योग, उर्जा, मार्केटिंग, मीडिया, कृषी या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. 

स्मृतीची नेत्रदीपक कामगिरी
महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधनाला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत स्मृतीने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले. न्यूझीलंड दौऱ्यात स्मृतीची बॅट चांगलीच तळपली होती. तिने पहिल्या सामन्यात शतकी खेळी करताना जेमिमा रॉड्रीग्जसह 190 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. 2018 या वर्षातील कामगिरीमुळे तिला आयसीसीने सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारानेही गौरविले होते.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने 2-1 अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला.  स्मृतीने 2018 वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 वन डे सामन्यांत दोन शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली. आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने ( 751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

'30 अंडर 30' म्हणजे नेमके काय
फोर्ब्सने या यादीमध्ये प्रत्येक देशातील 30 वर्षांखालील युवकांचा सन्मान केला जातो. 30 वर्षांखालील ज्या व्यक्तींनी देदिप्यमान कामगिरी केली आहे, त्यांना या यादीमध्ये प्रवेश दिला जातो.

Web Title: Smriti Manshana and Hima Das In the list of Forbes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.