सामना हरल्यामुळे चाहता संतापला; थेट खेळाडूलाच चाबकाने फटकारले, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 09:13 PM2024-04-12T21:13:57+5:302024-04-12T21:14:32+5:30

Saudi Super Cup Final: सौदी सुपर कप फायनल सामन्यात खेळाडूला चाबकाने फटके मारल्याची घटना घडली आहे.

Saudi Super Cup Final, fan angry at losing match; he hit player directly | सामना हरल्यामुळे चाहता संतापला; थेट खेळाडूलाच चाबकाने फटकारले, व्हिडिओ व्हायरल...

सामना हरल्यामुळे चाहता संतापला; थेट खेळाडूलाच चाबकाने फटकारले, व्हिडिओ व्हायरल...

Saudi Super Cup Final: खेळ कोणताही असो, मैदानात अनेकदा वाद होतात. कधी-कधी हे वाद विकोपाला जातात. मैदानात झालेल्या वादाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सौदीतून समोर आला आहे. सौदी सुपर लीगच्या अंतिम सामन्यात अल हिलाल संघ विजेतेपदाचा आनंद साजरा करत होता, तर दुसरीकडे लाजिरवाण्या पराभवानंतर अल इत्तिहाद संघांवर टीकेची झोड उठत होती. यादरम्यान, एका चाहत्याने अल इत्तिहादच्या खेळाडूवर चाबका हल्ला केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
अल हिलालने विजयी गोल केला, ज्यामुळे अल इत्तिहाद संघाचे चाहते संतापले. यावेळी खेळाडू अब्देरराजक हमदल्लाचा एका प्रेक्षकासोबत वाद झाला. यावेळी त्याने त्या प्रेक्षकाच्या दिशेने पाणी फेकले. त्यानंतर प्रत्युत्तरात त्या प्रेक्षकाने चक्क हमदल्लावर चाबकाचे वार केले. यावेळी तात्काळ इतर खेळाडू धावले आणि त्या दोघांना दूर केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

संघाचा 4-1 ने पराभव 
अल हिलाल आणि अल इत्तिहाद यांच्यातील लढत एकतर्फी झाली. अल हिलालने हा सामना 4-1 असा जिंकून विजेतेपद पटकावले. 

Web Title: Saudi Super Cup Final, fan angry at losing match; he hit player directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.