वाचा 2018 मध्ये क्रीडा जगतात काय काय विशेष? चाहत्यांना मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 06:49 PM2017-12-31T18:49:43+5:302017-12-31T18:49:50+5:30

2017 ला निरोप देताना आणि 2018 चे स्वागत करताना क्रीडाजगतावर नजर टाकल्यास येणारे वर्ष हे विश्वचषक, आॅलिम्पिक, राष्ट्रकुल आणि एशियाड अशा 'मेगा इव्हेंट'चे असल्याचे दिसून येईल.

Read What is special for the sport in 2018? Feast for fans | वाचा 2018 मध्ये क्रीडा जगतात काय काय विशेष? चाहत्यांना मेजवानी

वाचा 2018 मध्ये क्रीडा जगतात काय काय विशेष? चाहत्यांना मेजवानी

googlenewsNext

ललित झांबरे

मुंबई - 2017 ला निरोप देताना आणि 2018 चे स्वागत करताना क्रीडाजगतावर नजर टाकल्यास येणारे वर्ष हे विश्वचषक, आॅलिम्पिक, राष्ट्रकुल आणि एशियाड अशा 'मेगा इव्हेंट'चे असल्याचे दिसून येईल.

2018 चे मुख्य आकर्षण असेल ती रशियातील फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा मात्र त्याशिवाय दक्षिण कोरियात होणारे हिवाळी आॅलिम्पिक व हिवाळी पॅरालिम्पिक, आॅस्ट्रेलियात होणारे राष्ट्रकुल सामने, इंडोनेशियात होणारे एशियाड सामने, लंडनमध्ये होणारा टेबल टेनिसचा
सांघिक विश्वचषक, बर्मिंगहममध्ये होणारा जिम्नॅस्टिक्सचा विश्वचषक, लंडनमध्ये होणारी महिलांची आणि भारतात होणारी पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा आणि विंडीजमध्ये होणारा महिलांचा क्रिकेट टी-20 विश्वचषक आणि न्यूझीलंडमध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच खेळली जाणारी 19 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धा क्रीडाप्रेमींच्या कलेंडरमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवतील.

वर्षाच्या सुरुवातीलाच 13 जानेवारी ते 3 फेब्रुवारीदरम्यान न्यूझीलंडमध्ये 19 वर्षाआतील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. फेब्रुवारीत 9 ते 25 तारखेदरम्यान दक्षिण कोरियातील प्योंगचांग येथे हिवाळी आॅलिम्पिक होईल. त्याच ठिकाणी 9 ते 18 मार्चदरम्यान हिवाळी पॅरालिम्पिकच्या स्पर्धा रंगतील.

फेब्रुवारीमध्येच 22 ते 25 तारखेदरम्यान लंडनमध्ये टेबल टेनिसची सांघिक विश्वचषक स्पर्धा होईल.

21 व 22 मार्चला इंग्लंडमधल्या बर्मिंगहम येथे जिम्नॅस्टिक्सच्या विश्वचषक स्पर्धेत चित्तथरारक कसरती डोळ्यांचे पारणे फेडतील. त्यापाठोपाठ आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे 4 ते 15 एप्रिलदरम्यान राष्ट्रकूल सामने होणार आहेत. यात भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी अपेक्षा आहे.

यानंतर येईल ती क्रीडाविश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, 'फुटबॉलचा विश्वचषक'. रशियात 14 जून ते 15 जुलैदरम्यान या स्पर्धेनिमित्ताने सहभागी 32 देशांशिवाय सारे जग फुटबॉलमय झालेले बघायला मिळेल.

यंदा हॉकीतील पुरुष व महिला अशा दोन्ही विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. महिलांची विश्वचषक स्पर्धा 21 जुलै ते 5 आॅगस्टदरम्यान लंडनमध्ये खेळली जाणार आहे तर पुरुषांची विश्वचषक स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान भारतात नियोजित आहे.

हिवाळी आॅलिम्पिक व राष्ट्रकूलनंतर 2018 मध्ये आणखी एक बहुविध खेळांची बहुराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे ती म्हणजे 2018 चे आशियायी क्रीडा सामने (एशियाड). इंडोनेशियातील जाकार्ता व पलेम्बांग येथे 18 आॅगस्ट ते 2 सप्टेंबर या काळात या स्पर्धा होणार आहेत. आशियाडच्या इतिहासात प्रथमच दोन शहरांना मिळालेले संयुक्त यजमानपद हे यावेळेचे वैशिष्टय.

इकडे आशियाई सुपरपॉवरचा फैसला इंडोनेशियात होत असताना तिकडे त्याआधी युरोपमध्ये 1 ते 12 आॅगस्टदरम्यान झालेल्या युरोपियन स्पोर्टस चॅम्पियनशीपमध्ये युरोपियन सुपर पॉवरचा फैसला झालेला असेल. ग्लासगो आणि बर्लिन येथे नौकानयन, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, जलक्रीडा, अ‍ॅथलेटिक्स आणि ट्रायथलॉन या क्रीडाप्रकारातल्या स्पर्धा होणार आहेत.

क्रिकेटची वषार्तील दुसरी विश्वचषक स्पर्धा वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात वेस्टइंडिजमध्ये खेळली जाईल. महिला क्रिकेटची ही टी-20 विश्वचषक स्पर्धा असेल. यावेळी भारतीय महिला विश्वविजेतेपद आणतील काय, हे पाहणे मनोरंजक ठरेल.

याशिवाय 2018 मधील विशेष बाब ठरेल ती म्हणजे आयर्लंडच्या संघाला मिळणार असलेला कसोटी क्रिकेटचा दर्जा. आपला पहिला अधिकृत कसोटी सामना ते 11 ते 15 मे दरम्यान पाकिस्तानविरुध्द मलाहिदे येथे खेळतील.


2018 मधील इतर प्रमुख क्रीडा स्पर्धा अशा..

  • 2 ते 4 मार्च- वर्ल्ड इनडोअर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप, बर्मिंघम
  • 21 एप्रिल ते 7 मे- स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशीप, शेफिल्ड
  • 26 ते 29 एप्रिल- ज्युदोची युरोपियन चॅम्पियनशीप, तेल अविव्ह
  • 29 एप्रिल ते 6 मे- टेबल टेनिस वर्ल्ड चॅम्पियनशीप, हल्मस्टाड, स्वीडन
  • 19 मे- फुटबॉल एफ.ए. कप फायनल, वेम्बली
  • 26 मे- फुटबॉल , चॅम्पियन्स लीग फायनल, कीव्ह, युक्रेन
  • 14 ते 17 जून- कराटे वर्ल्ड चॅम्पियनशीप, डुंडी
  • 30 जुलै ते 5 आॅगस्ट - बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीप, नानजिंग, चीन
  • 30 जुलै ते 12 आॅगस्ट - शिडाच्या नुकांची जागतिक स्पर्धा, आरहूस, डेन्मार्क
  • 31 जुलै ते 5 आॅगस्ट- तायक्वोंदो वर्ल्ड चॅम्पियनशीप, ब्युनोस आयर्स
  • 23 ते 26 आॅगस्ट- कनोईंग स्प्रिंट वर्ल्ड चॅम्पियनशीप , पोतुर्गाल
  • 6ते 16 सप्टेंबर - क्लायम्बिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप , इन्सब्रूक, आॅस्ट्रिया
  • 9 ते 16 सप्टेंबर - नौकानयन वर्ल्ड चॅम्पियनशीप , बल्गेरिया
  • 16 ते 23 सप्टेंबर - ज्युदो वर्ल्ड चॅम्पियनशीप, बाकू, अझरबैजान
  • 28 ते 30 सप्टेंबर - गोल्फ रायडर कप, फ्रान्स
  • 25 आॅक्टोबर ते 3 नोव्हेंबर - जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅम्पियनशीप , दोहा
  • 10 ते 11नोव्हेबर- टेनिस फेडरेशन कप फायनल
  • 12 ते 18 नोव्हेंबर - टेनिस एटीपी फायनल्स
  • 23 ते 25 नोव्हेंबर - टेनिस डेव्हिस कप फायनल

Web Title: Read What is special for the sport in 2018? Feast for fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.