पॅरा जलतरणपटू प्रशांत कर्माकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:48 AM2018-03-02T02:48:46+5:302018-03-02T02:48:46+5:30

मागच्या वर्षी जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान सहकारी महिला जलतरणपटूचे व्हिडिओ चित्रण केल्यावरून पॅरा जलतरणपटू प्रशांत कर्माकर याला तीन वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Para swimmer Prashant Karmakar suspended | पॅरा जलतरणपटू प्रशांत कर्माकर निलंबित

पॅरा जलतरणपटू प्रशांत कर्माकर निलंबित

googlenewsNext

नवी दिल्ली : मागच्या वर्षी जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान सहकारी महिला जलतरणपटूचे व्हिडिओ चित्रण केल्यावरून पॅरा जलतरणपटू प्रशांत कर्माकर याला तीन वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतीय पॅरालिम्पिक समितीने (पीसीआय) गुरुवारी ही घोषणा केली.
असभ्य वर्तन, हाणामारी आणि शांतता भंग करण्याच्या लेखी तक्रारीनंतर २०१० च्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा कांस्यविजेता प्रशांत कर्माकरविरुद्ध प्रकरण दाखल करण्यात आले आहे. स्पर्धेदरम्यान महिला खेळाडूचा व्हिडिओ तयार करण्यास सहकाºयाला सांगितल्याचा प्रशांतवर आरोप आहे. महिला जलतरणपटूच्या नातेवाइकांनी यावर आक्षेप नोंदविला. त्यावर या सहकाºयाने प्रशांतच्या सूचनेवरून आपण हा व्हिडिओ बनविल्याची कबुली पीसीआयच्या जलतरण समितीचे चेअरमन व्ही. के. डबास यांच्यासमक्ष दिली होती. खुद्द कर्माकर यालादेखील त्याच्या स्वत:च्या कॅमेºयाने महिला जलतरणपटूचा व्हिडिओ बनविताना पकडण्यात आल्याचा दावा पीसीआयने केला आहे.
कर्माकर याला पीसीआय चेअरमन आणि अन्य पदाधिकाºयांनी पाचारण केले तेव्हा प्रशांतने या पदाधिकाºयांना उर्मटपणे लेखी तक्रार दाखवा, अशी उलट विचारणा केली.
कुटुंबीयांनी त्वरित लेखी तक्रार नोंदविल्यानंतरही कर्माकरने डबास आणि हरियाणाचे महिपालसिंग यांच्यासोबत हुज्जत घातली. आपण अर्जुन पुरस्कार विजेता असल्याची सबब देत प्रशांतने व्हिडिओ चित्रण डिलिट करण्यास नकार दिला.
३७ वर्षांच्या प्रशांतला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात तो व्हिडिओ चित्रण आणि फोटो डिलिट करण्यास तयार झाल्याने, त्याची मुक्तता करण्यात आली.
(वृत्तसंस्था)

Web Title: Para swimmer Prashant Karmakar suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.