अपंगत्वावर मात करून विश्वचषक स्पर्धेपर्यंत गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:17 AM2019-05-12T00:17:51+5:302019-05-12T00:18:15+5:30

पनवेलमधील देविदास महादेव पाटीलची पोलंडमध्ये होणाऱ्या कायाकिंग अँड कनोर्इंग (बोटिंग खेळ) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अपंगत्वावर मात करून देविदासने मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

 Overcoming Disability and World Cup Championship | अपंगत्वावर मात करून विश्वचषक स्पर्धेपर्यंत गवसणी

अपंगत्वावर मात करून विश्वचषक स्पर्धेपर्यंत गवसणी

googlenewsNext

- मयूर तांबडे

पनवेल : पनवेलमधील देविदास महादेव पाटीलची पोलंडमध्ये होणाऱ्या कायाकिंग अँड कनोर्इंग (बोटिंग खेळ) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अपंगत्वावर मात करून देविदासने मिळविलेले यश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
पनवेल तालुक्यातील देवळोली गावातील देविदास पाटील जन्मापासून अपंग आहे. नोकरी न करता काहीतरी वेगळे करून दाखवायची आवड होती, पण अपंगत्वामुळे अडचण येत होती. १२ वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून फायर अँड सेफ्टीचा डिप्लोमा पूर्ण केला. एके ठिकाणी नोकरीला लागला, मात्र नोकरीत मन लागत नसल्याने तो पॉवर लिफ्टिंग खेळायला लागला. पण यासाठी आहार व इतर गोष्टींवर खर्च जास्त असल्याने हा खेळही सोडून दिला. पायाने अपंग असल्याने गोळाफेक व भालाफेक करणे त्याला जमले नाही. त्याने अपंगांसाठी कोणते खेळ खेळू शकतो याची माहिती इंटरनेटवरून घेतली. त्यावेळी त्याला दिल्लीच्या एका खेळांशी संबंधित संस्थेचा नंबर मिळाला व संंबंधितांच्या सूचनेवरून भोपाळ गाठले. तेथे पोहणे शिकला व वजनही कमी करून कायाकिंग अँड कनोर्इंग खेळात करिअर करण्याचे निश्चित केले.
रायगड जिल्ह्यात कुठेही कायाकिंग अँड कनोर्इंग (बोटिंग खेळ) या खेळाचे ट्रेनिंग सेंटर नसल्याने त्याला सांगली गाठावी लागली. त्यानंतर त्याला सांगली येथील कायाकिंग अँड कनोर्इंगचे महाराष्टÑ असोसिएशनचे सेक्रे टरी दत्ता पाटील यांनी मदत केली. देशपातळीवर खेळताना २0१८ मध्ये देविदासला ब्रांझ पदक मिळाले होते. तर फेब्रुवारी २0१९ मध्ये झालेल्या स्पर्धेत एका सेकंदासाठी त्याचे सुवर्ण पदक हुकले होते, त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. देशपातळीवर खेळताना ज्यांना पदक मिळाले त्यांची निवड पोलंड येथील विश्वचषकासाठी करण्यात आली. महाराष्ट्रातून एकमेव देविदास पाटील याची या कायाकिंग अँड कनोर्इंग या खेळासाठी विश्वचषकासाठी निवड करण्यात आलेली आहे.

अडचणींची मालिका सुरूच
विश्वचषकापूर्वी कॅम्पसाठी देविदासला हंगेरी (युरोप) येथे जायचे आहे, मात्र आर्थिक परिस्थितीअभावी त्याचे जाणे रखडले आहे. कॅम्पमधून पोलंडला खेळण्यासाठी रवाना व्हायचे असून त्यासाठी अंदाजे दीड लाख रुपये खर्च येणार आहे. पनवेल व रायगड जिल्ह्याचे नाव उंचावणाºया या खेळाडूला आर्थिक मदतीची गरज आहे. परिसरातील विविध संस्था व दानशूर नेत्यांनी त्याला मदत केली तरच तो विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे.

Web Title:  Overcoming Disability and World Cup Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल