महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 01:16 PM2020-07-11T13:16:37+5:302020-07-11T13:17:13+5:30

राज्यात शुक्रवारी 7862 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 38,461 इतकी झाली आहे

Olympian Dattu Baban Bhokanal become a farmer during covid-19 | महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!

महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!

googlenewsNext

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्य 1 कोटी 26 लाख 31,866 इतकी झाली आहे. त्यापैली 73 लाख 67,593 रुग्ण बरे झाले असून 5 लाख 62,921 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 22,674 इतका झाला असून त्यापैकी 5 लाख 16,308 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22,152 रुणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. राज्यात शुक्रवारी 7862 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 38,461 इतकी झाली आहे. एकूण 1 लाख 32,625 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 95647 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे अजूनही अनेक भागात कडक लॉकडाऊन पाळला जात आहे. 

क्रीडा स्पर्धा होत नसल्यानं अनेक खेळाडूंना घरीच रहावे लागत आहे. या परिस्थितीत ऑलिम्पियनपटू दत्तू भोकनळ शेतात काम करत आहे. नौकानयनपटू दत्तू भोकनळनं शनिवारी सोशल मीडियावर शेतात काम करत असल्याचे फोटो पोस्ट केले. दत्तू हा मुळचा नाशिक जिल्ह्यातील तळेगाव रोही येथील रहिवाशी आहे. 

त्यानं लिहिलं की,
Yes I am a FarmerMan farmer
घामाचे थेंब पेरून मातीतून मोती मिळवुन देणारा एकमेव कारागीर म्हणजे शेतकरी ...
काळ्या मातीत जन्म माझा काळ्या मातीशी नातं...
काळ्या आईची करनी तिला,लेकराची माया!
माय होईल हिरवी गान,हिरीताच गाया!
वरती आभाळाची हाये मला,बापावानी छाया!
#जय_जवान_जय_किसान!


दत्तूनं दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई व ओशियानिक ऑलिम्पिक पात्रता फेरीत 7 मिनिटं 07.63 सेकंटाची वेळ नोंदवून रिओ ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली होती. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेला तो एकमेव भारतीय नौकानयपटू आहे. 2018च्या आशियाई स्पर्धेत त्यानं Men's Quadruple sculls प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. 

पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!

दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?

भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!

Web Title: Olympian Dattu Baban Bhokanal become a farmer during covid-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.