कामगिरीत सातत्य राखावे लागेल : मुरलीधरन

By admin | Published: May 13, 2015 12:12 AM2015-05-13T00:12:49+5:302015-05-13T00:12:49+5:30

आयपीएलच्या आठव्या पर्वात अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, असे सलग तीन विजयासह

Need to maintain consistency: Muralitharan | कामगिरीत सातत्य राखावे लागेल : मुरलीधरन

कामगिरीत सातत्य राखावे लागेल : मुरलीधरन

Next

हैदराबाद : आयपीएलच्या आठव्या पर्वात अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यासाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे, असे सलग तीन विजयासह प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याचा दावा मजबूत करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांनी म्हटले आहे.
सनरायझर्सने सोमवारी रात्री खेळल्या गेलेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा पाच धावांनी पराभव करीत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. सनरायझर्सने १२ सामन्यांत १४ गुणांची कमाई केली. सनरायझर्सला आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स या संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. प्ले आॅफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला आता केवळ एका विजयाची गरज आहे, असे मुरलीधरन म्हणाले. गेल्या तीन-चार सामन्यांत आमची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. आम्हाला आणखी दोन सामने खेळायचे असून, त्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर प्ले आॅफमधील स्थान निश्चित करता येईल. सनरायझर्स संघाला यानंतर दोन्ही सामने गृहमैदानावर खेळायचे असून, संघासाठी ही जमेची बाजू आहे, असेही मुरलीधरन यांनी या वेळी स्पष्ट केले.
मुरलीधरन म्हणाले, ‘‘आम्हाला येथील खेळपट्टीची चांगली माहिती आहे. त्यामुळे आम्हाला संघाची अचूक निवड करता येईल.’’
पंजाबचा फलंदाज डेव्हिड मिलरने सोमवारी ४४ चेंडूंमध्ये ८९ धावांची खेळी केली; पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरे पडले.
मुरलीधरन पुढे म्हणाले, ‘‘आयपीएलमध्ये असे चुरशीचे सामने खेळले जातात. प्रत्येक संघात चांगल्या खेळाडूंचा समावेश असतो. निकाल अनुकूल ठरणे महत्त्वाचे असते. त्यात एका धावेने किंवा दोन धावांनी विजय मिळवला, याला अधिक महत्त्व नसते. प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी गुणतालिकेतील स्थान महत्त्वाचे असते आणि त्यासाठी विजय मिळवणे महत्त्वाचे ठरते.’’(वृत्तसंस्था)

Web Title: Need to maintain consistency: Muralitharan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.