राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 05:12 PM2019-02-17T17:12:08+5:302019-02-17T17:12:27+5:30

महाराष्ट्राच्या मुलींनी ड गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ओडीसाचा ४०-१९असा पराभव करीत या गटात अपराजित रहात बाद फेरी गाठली.

National Kabbadi Tournament: Both the teams of Maharashtra are in the knockout stage | राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

googlenewsNext

मुंबई : प.बंगाल येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बंदिस्त क्रीडा संकुलात सुरू झालेल्या "४५व्या कुमार/कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. आज महाराष्ट्राच्या मुलींनी ड गटातील आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात ओडीसाचा ४०-१९असा पराभव करीत या गटात अपराजित रहात बाद फेरी गाठली. पूर्वार्धात १लोण देत महाराष्ट्राने २३-०९अशी भक्कम आघाडी राखली होती. या मोठ्या आघाडी मुळे प्रशिक्षिका वीणा खवळे (शेलटकर) हिने आपल्या राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी दिली. उत्तरार्धात आणखी १लोण देत हा सामना मोठ्या फरकाने जिंकला. सोनाली हेळवी, प्रतीक्षा तांडेल यांच्या दमदार चढाया त्याला साक्षी रहाटेच्या पकडीची मिळालेली मजबूत साथ यामुळे हा विजय सोपा गेला.
महाराष्ट्राच्या मुलांनी देखील क गटात हिमाचल प्रदेशचा ३५-३१ असा पराभव करीत या गटात अव्वल क्रमांक पटकावित बाद फेरी गाठली. पूर्वार्धात एक लोण देत २२-०९अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरार्धात हिमाचलने चांगलेच झुंजवले. लोणची परतफेड करीत हिमाचलने महाराष्ट्राची आघाडी कमी करीत आणली. पण मोक्याच्या क्षणी महाराष्ट्राचे प्रशिक्षक आयुब पठाण व लक्ष्मण गावंड यांनी खेळाडूंना सामना शांतपणे खेळण्यास प्रवृत्त करीत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पंकज मोहिते, असलम इनामदार यांचा अष्टपैलू खेळ त्याला शुभम शेळके, सौरभ पाटील यांची मिळालेली चढाईची साथ यामुळे हा विजय मिळविता आला. महाराष्ट्राचा बचाव उत्तरार्धात दुबळा ठरला.

इतर निकाल संक्षिप्त :- मुले १)विदर्भ वि वि छत्तीसगड (४१-३९); २)गोवा वि वि ओडीसा (३४-१९); ३)पॉंडेचरी वि वि विदर्भ (३४-३०)
 मुली :- १)मध्य प्रदेश वि वि विदर्भ (४७-३२); २)बिहार वि वि उत्तरांचल (५६-३५); ३) उत्तर प्रदेश वि वि तेलंगणा (३४-१४).

Web Title: National Kabbadi Tournament: Both the teams of Maharashtra are in the knockout stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.