राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्र उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 09:20 PM2019-01-30T21:20:38+5:302019-01-30T21:21:08+5:30

महाराष्ट्राने केरळचा ५४-३८असा पराभव करीत आगेकूच केली.

National Kabaddi: Maharashtra In the quarterfinals | राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्र उपांत्य फेरीत

राष्ट्रीय कबड्डी : महाराष्ट्र उपांत्य फेरीत

Next

रोहा : महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीत बिहारला ३९-१६ असे नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात अजिंक्य पवारचा झंजावात पाहायला मिळाला. अजिंक्यने १२ चढायांमध्ये १बोनससह ८गुण मिळवले, तर रिशांक देवाडिगाने ८चढायांमध्ये  ५  आणि तुषार पाटीलनेही ८चढायांमध्ये   ५ गुण पटकावले.

 

महाराष्ट्र, बिहार, भारतीय रेल्वे, कर्नाटक यांनी " ६६व्या पुरुष वरिष्ठ गट" राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली.  रायगड रोहा येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने केरळचा ५४-३८असा पराभव करीत आगेकूच केली.

रिशांकने आपल्या पहिल्या चढाईत बोनस गुण करीत महाराष्ट्राच्या गुणांचे खाते खोलले. ८व्या मिनिटाला तुषार पाटीलने शिलकी ४ गडी एकाच चढाईत टिपत केरळवर पहिला लोण देत १५-०४ अशी आघाडी घेतली. पुन्हा जोरदार आक्रमण करीत दुसरा लोण देत आणला होता, पण केरळच्या शिलकी एक खेळाडूने बोनससह दोन गडी टिपत व निलेश साळुंखेची अव्वल पकड करीत होणारा लोण केरळने लांबविला. मध्यांतराला २४-१२अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. मध्यांतरानंतर ३ऱ्या मिनिटाला दुसरा लोण देत महाराष्ट्राने २९-१३अशी आघाडी घेतली. तिसरा लोण देताना पुन्हा एकदा तुषारने ६व्या मिनिटाला ४गडी टिपले तर शिलकी दोन गडी रिशांकने टिपत ७व्या मिनिटाला लोण देत ४२-१८ अशी आघाडी वाढविली. यानंतर तुषारला विश्रांती देण्यात आली. पण मध्यांतरा नंतर ११व्या मिनिटाला एका  लोणची परतफेड करीत केरळ ने ३०-४५अशी आघाडी कमी केली. पुन्हा एकदा महाराष्ट्राने जोरदार कमबॅक करीत १६ गुणांनी सामना खिशात टाकला.
महाराष्ट्राकडून तुषार पाटील ७चढाया करीत १०गुण मिळविले. अजिंक्य पवारने ८ चढायात ८गुण घेतले. रिशांकने देखील चढायात गुण घेतले. विशाल माने व विकास काळे यांनी ४-४पकडी घेत आपली भूमिका पार पाडली. केरळ कडून जिष्णु के के यांनी ८ चढायात २ बोनस व ६ गडी टिपले. सागर कृष्णाने ४ पकडी करीत चांगला प्रतिकार केला.
दुसऱ्या सामन्यात बिहारने राजस्थानचा प्रतिकार ४५-४४असा मोडून काढत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यांतराला २३-१९अशी आघाडी बिहारकडे होती. बिहार कडून नवीनने ३४ चढाया करताना ३बोनस सह १९ गुण मिळवीत या विजयात म्हत्वाचे योगदान दिले. राजस्थानकडून सचिनने १७ चढायात ३ बोनस व १२गुण घेत चांगला प्रतिकार केला.  इतर सामन्यात कर्नाटकने पोंडेचरिला ६४-२२असे, तर भारतीय रेल्वेने दिल्लीला ५६- ३१असे नमवित आगेकूच केली.

Web Title: National Kabaddi: Maharashtra In the quarterfinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.