नदाल,फेरर उपउपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Published: June 1, 2014 12:37 AM2014-06-01T00:37:51+5:302014-06-01T00:37:51+5:30

डेव्हिड फेररने इटलीच्या आंद्रियास सेप्पीचा 6-2, 7-6, 6-3 ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

Nadal and Ferrer in the pre-quarterfinals round | नदाल,फेरर उपउपांत्यपूर्व फेरीत

नदाल,फेरर उपउपांत्यपूर्व फेरीत

Next
>पॅरिस : जगातील नंबर एकचा खेळाडू स्पेनचा राफेल नदालने अर्जेटीनाच्या लियानाडरे मेयरचा  6-2, 7-5, 6-2 तर गतउपविजेत्या डेव्हिड फेररने इटलीच्या आंद्रियास सेप्पीचा 6-2, 7-6, 6-3 ने पराभव करीत  फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. महिला गटात पाचव्या मानांकित पेत्र क्विटोव्हा व 11व्या मानांकित अॅना इव्हानोव्हिच यांना पराभव स्वीकारावा लागला.  
फेररला सेप्पीचा पराभव करताना फारसे कष्ट पडले नाहीत.फेररची यापूर्वी सहा वेळा सेप्पीसोबत लढत झालेली असून, त्याने अद्याप एकही सेट गमाविलेला नाही. फेररला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्यासाठी 19व्या मानांकित दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. क्रोएशियाच्या इव्हो कालरेव्हिचने पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याने अँडरसनचा पुढच्या फेरीचा मार्ग प्रशस्त झाला. अँडरसनविरुद्धच्या लढतीत पहिला सेट 3-6 ने गमाविल्यानंतर कालरेव्हिचने दुखापतीमुळे माघार घेतली. 
कालरेव्हिच 6 फूट 11 इंच उंच असून, अँडरसनची उंची 6 फूट 8 इंच आहे. त्यामुळे ग्रॅण्डस्लॅमच्या इतिहासातील सर्वात उंच खेळाडूंदरम्यान ही लढत खेळली जाणार असल्याचे मानले जात होते.   1995नंतर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत अंतिम 16मध्ये प्रथमच तीन खेळाडू खेळतील, अशी अमेरिकेला आशा होती. पण, ज्ॉक सोक पराभूत झाल्यामुळे त्यांच्या आशा संपुष्टात आल्या. सर्बियाच्या डुसान लाजोव्हिचने सोकचा 6-4, 7-5, 6-3ने पराभव केला. 
अमेरिकन टेनिसपटू आंद्रे अगासी, मायकल चांग व जिम कुरियर यांनी 1995मध्ये फ्रेंच ओपनमध्ये अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते. या वेळी अमेरिकेच्या जॉन इस्नरने अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळविलेले असून, डोनाल्ड यंगला संधी आहे. 
चौथ्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने स्पेनच्या मारिया टेरेसा टोरोचा 6-3, 6-क्ने पराभव करीत अव्वल मानांकित खेळाडूंच्या पराभवाची मालिका खंडित केली. 11व्या मानांकित इव्हानोव्हिचला चेक प्रजासत्ताकच्या लुसी सफारोव्हाविरुद्ध 6-3, 6-3ने पराभव स्वीकारावा लागला. अन्य सामन्यात 15व्या मानांकित अमेरिकेच्या स्लोएन स्टिफन्सने रशियाच्या एकाटेरिना मकारोव्हाचा 6-3, 6-4ने पराभव केला. 1क्व्या मानांकित इटलीच्या सारा इराणीने इस्रायलच्या ज्युलिया ग्लश्कोचा 6-क्, 6-1ने धुव्वा उडवत चौथी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)
 
सानिया-कारा यांची आगेकूच
सानिया मिङर व कारा ब्लॅक यांनी शनिवारी ग्रॅब्रियल डाब्रोवस्की व एलिजा रोसोलस्का यांचा पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारत व ङिाम्बाब्वेच्या पाचव्या मानांकित जोडीने दुस:या फेरीच्या लढतीत केवळ 59 मिनिटांमध्ये कॅनडा व पोलंडच्या बिगरमानांकित जोडीवर 6-1, 6-2ने सरशी साधली. या एकतर्फी सामन्यात सानिया-कारा यांना केवळ एकदा ब्रेक पॉइंटला सामोरे जावे लागले. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीची सव्र्हिस चारदा भेदली. सानिया-कारा यांना पुढच्या फेरीत सर्बियाच्या येलेना यांकोव्हिच व रशियाच्या एलिसा क्लेबानोव्हा या जोडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. यांकोव्हिच व क्लेबानोव्हा यांना शेरोन फिचमॅन व पावलिचेन्कोव्हा यांच्याविरुद्ध पुढे चाल मिळाली. 
 
महिला विभागात रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाने क्विटोवाची झुंज 6-7, 6-1, 9-7ने मोडून काढली. क्विटोव्हाच्या पराभवामुळे महिला विभागातील अव्वल पाच मानांकित खेळाडूंंपैकी चार खेळाडूंचे आव्हान संपुष्टात आलेले आहे. 

Web Title: Nadal and Ferrer in the pre-quarterfinals round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.