Know about Manika Batra table tennis player PM Narendra Modi gave fitness challenge | पंतप्रधान मोदींनी या मुलीला दिलं फिटनेस चॅलेंज, कोण आहे ही मनिका बत्रा?

नवी दिल्ली : मनिका बत्राचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण मनिकाला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेस चॅलेंज दिलं आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सुरु केलेलं हे फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या मुलीली चॅलेंज दिलं ती दुसरी कुणी नसून भारताची अव्वल महिला टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा आहे. भारतीय खेळ प्रेमींमध्ये भलेही ती जास्त लोकप्रिय नसली तरी ती देशातील टॉपच्या महिला खेळाडूंपैकी एक आहे. 

(Image Credit: Free Press Journal)

गेल्या 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समधून मनिकाने आपल्या दमदार खेळाच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित केलं. टेबल टेनिसच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चार पदक तिने इतिहास रचला. कॉमनवेल्थ खेळांमध्ये हा कारनामा करणारी ती पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू ठरली. 

(Image Credit: financialexpress.com)

22 वर्षीय मनिकाने टेबल टेनिसमध्ये महिला सिंगल्समध्ये केवळ गोल्ड जिंकलं नाहीतर महिला डबल्समध्ये सिल्व्हर आणि मिक्स्ड डबल्समध्ये ब्रॉंझ पदकही जिंकलं. आता ती देशातील टॉपच्या महिला टेबल टेनिस खेळाडूंमध्ये आली आहे. आणि तिने पंतप्रधान मोदी यांचं फिटनेस चॅंलेज स्विकारलं आहे. 


Web Title: Know about Manika Batra table tennis player PM Narendra Modi gave fitness challenge
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.