निवडणुका घ्या नाहीतर निलंबनाला सामोरे जा; IOC ने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:31 PM2022-07-22T12:31:40+5:302022-07-22T12:35:29+5:30

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एक इशारा दिला आहे.

International Olympic Committee has said that the Indian Olympic Organization will be suspended if the elections are not held | निवडणुका घ्या नाहीतर निलंबनाला सामोरे जा; IOC ने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला दिला इशारा

निवडणुका घ्या नाहीतर निलंबनाला सामोरे जा; IOC ने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला दिला इशारा

Next

नवी दिल्ली : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एक इशारा दिला आहे. आगामी आठवड्यात निवडणुक आयोजित नाही केली तर प्रशासक मंडळ निलंबित केलं जाईल अशी धमकी आयओसीने (International Olympic Committee) भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (Indian Olympic Association) दिली आहे. "आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आशिया ऑलिम्पिक परिषद (OCA) भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर परिणाम करणाऱ्या घटकांवरून चिंतेत आहे." असं IOA कार्यकारी परिषदेच्या सर्व सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

भारतीय ऑलिम्पिक संघटना आपली जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरल्यास आणि आगामी आठवड्यात निवडणुका घेतल्या नाहीत तर दुर्दैवाने वेगळा निर्णय घ्यावा लागेल. निलंबनासह संघटनेविरूद्ध योग्य विचार करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नसेल. जोपर्यंत भारतीय ऑलिम्पिक संघटना नेहमीप्रमाणे कार्यरत होत नाही आणि निवडणुका घेत नाही तोपर्यंत अशी स्थिती कायम राहील असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

आयओसीने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला सुनावलं
आम्हाला आशा आहे की भारतीय ऑलिम्पिक संघटना भारतातील क्रिडापटूंच्या हितासाठी कार्य करेल आणि त्यानुसार आपली जबाबदारी पार पाडेल. तसेच तुमचा याबाबत लवकर प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा असल्याचं पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुका मागील वर्षी डिसेंबरमध्ये होणार होत्या परंतु निवडणूक प्रक्रियेत सुरू असलेल्या दुरुस्तीमुळे त्या वेळापत्रकानुसार होऊ शकल्या नाहीत.

बत्रा यांच्या राजीनाम्यानंतर अस्थिरता 
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने निवडणुका घेण्यापूर्वी दुरूस्त्या पाहण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन केली होती. यावर्षी मे महिन्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने हॉकी इंडियामधील 'आजीवन सदस्य' पद रद्द केल्यानंतर नरिंदर बत्रा यांना भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या प्रमुखपदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्या सौजन्याने त्यांनी २०१७ मध्ये सर्वोच्च संस्थेची निवडणूक लढवून जिंकली देखील होती. मात्र बत्रा यांनी अधिकृतपणे राजीनामा दिला त्यानंतर उच्च न्यायालयाने बत्रा यांना पुन्हा एकदा ही निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला होता.
 

Web Title: International Olympic Committee has said that the Indian Olympic Organization will be suspended if the elections are not held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.