आंतरराष्ट्रीय मुष्ठीयुद्ध स्पर्धा : गौरव सोळंकी, कौशिक यांना ‘सुवर्ण’

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 03:11 AM2019-05-06T03:11:22+5:302019-05-06T03:12:10+5:30

पोलंडमध्ये वार्सा येथे सुरू असलेल्या २६ व्या फेलिक्स स्टेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली.

 International Boxing Championship: Gaurav Solanki, Kaushik won 'gold' | आंतरराष्ट्रीय मुष्ठीयुद्ध स्पर्धा : गौरव सोळंकी, कौशिक यांना ‘सुवर्ण’

आंतरराष्ट्रीय मुष्ठीयुद्ध स्पर्धा : गौरव सोळंकी, कौशिक यांना ‘सुवर्ण’

googlenewsNext

नवी दिल्ली : पोलंडमध्ये वार्सा येथे सुरू असलेल्या २६ व्या फेलिक्स स्टेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. भारतीय बॉक्सर्सनी या स्पर्धेत एकूण सहा पदके पटकावली
आहेत. त्यात दोन सुवर्ण पदकांसह एक रौप्य व तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारताच्या २२ वर्षीय सोळंकीने इंग्लंडच्या विलियम काऊलेचा ५-० ने पराभव करीत सुवर्ण पदकाचा मान मिळवला. सोळंकीने मागील वर्षी झालेल्या राष्टÑकूल स्पर्धा व केमिस्ट्री चषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते.या कामगिरीचीच पुनरावृती त्याने या स्पर्धेत केली.
मागील वर्षी झालेल्या इंडिया ओपन स्पर्धेत सुवर्ण व राष्टÑकूल स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या २३ वर्षीय कौशिक (६० किलो) यालाही सुवर्ण पदक पटकावताना विशेष अडचण आली नाही. त्याने मोरक्कोच्या मोहम्मद हमोतचा ४-१ ने पराभव केला.
बँटमवेट स्पेशालिस्ट मोहम्मद हसमुद्दीन (५६) याला मात्र यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याला अंतिम लढतीत रशियाच्या मुखमाद शेखोवविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला.

भारताच्या अन्य तीन मुष्ठीयोद्धयांना उपांत्यफेरीत पराभव पत्करावा लागल्याने कास्यंपदकावर समाधान मानावे लागले.मनदीप जांगडा याला ६९ किलो गटात रशियाच्या वादिम मुसाईव्ह याच्याकडून ०-५ ने पराभूत व्हावे लागले. संजीतला ९१ किलो गटात न्यूझीलंडच्या डेव्हिड नायका याने ५-० ने पराभूत केले.
भारताच्या अंकित खटाना
याला ६४ किलो गटात संघर्षपूर्ण सामन्यात पोलंडच्यया डॅमियन दुर्काजकडून २-३ असे पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)

Web Title:  International Boxing Championship: Gaurav Solanki, Kaushik won 'gold'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.