शर्यतीत चौथा येऊनही भारताच्या इरफाननं जिंकल 2020च्या ऑलिम्पिक तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:55 PM2019-03-17T12:55:24+5:302019-03-17T12:55:44+5:30

केरळच्या मलप्पुरम गावातील इरफान कोलोथूम थोडी या 29 वर्षीय खेळाडूने रविवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट जिंकलं.

India's Irfan KT qualifies for Tokyo 2020 Olympics after finishing fourth in Asian Race Walking Championship | शर्यतीत चौथा येऊनही भारताच्या इरफाननं जिंकल 2020च्या ऑलिम्पिक तिकीट

शर्यतीत चौथा येऊनही भारताच्या इरफाननं जिंकल 2020च्या ऑलिम्पिक तिकीट

Next

नवी दिल्ली : केरळच्या मलप्पुरम गावातील इरफान कोलोथूम थोडी या 29 वर्षीय खेळाडूने रविवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट जिंकलं. जपान येथे सुरू असलेल्या आशियाई चालण्याच्या शर्यतीच्या अजिंक्यपद सपर्धेत इरफाननं 1 तास 20.57 सेकंदाची वेळ नोंदवताना ऑलिम्पिक आणि 2019मध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली. विशेष म्हणजे इरफानला आशियाई स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.



20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत त्याने 1:20.57 सेकंदाची वेळ नोंदवताना ऑलिम्पिक प्रवेश पक्का केला. 27 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही तो आता सहभागी होणार आहे. इरफानसह आशियाई स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून देविंदर आणि गणपती या भारतीय खेळाडूंनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता निश्चित केली. देविंदरने 1 तास 21.22 सेकंदाची, तर गणपतीने 1 तास 22.12 सेकंदाची वेळ नोंदवली.


इरफानने 2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतही देशाचे प्रतिनिधित्व केले होते. गतवर्षी तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान ‘no needle policy’ चे उल्लंघन केल्यामुळे त्याला स्पर्धेतून माघारी पाठवण्यात आले होते.  

Web Title: India's Irfan KT qualifies for Tokyo 2020 Olympics after finishing fourth in Asian Race Walking Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.