पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

By admin | Published: February 7, 2016 03:17 AM2016-02-07T03:17:28+5:302016-02-07T03:17:28+5:30

भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) पहिल्या दिवशी चमकदार कामगिरी करताना कुस्ती, जलतरण आणि भारोत्तोलन या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवताना सुवर्णपदकांचा

India's dominance over the first day | पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Next

गुवाहाटी : भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) पहिल्या दिवशी चमकदार कामगिरी करताना कुस्ती, जलतरण आणि भारोत्तोलन या क्रीडा प्रकारांमध्ये वर्चस्व गाजवताना सुवर्णपदकांचा जवजवळ ‘क्लीन स्वीप’ केला. भारताने पहिल्या दिवशी १४ सुवर्ण आणि पाच रौप्य पदकांसह एकूण १९ पदके पटकावली. पदक तालिकेत भारत अव्वल स्थानी आहे. श्रीलंकेने एकूण २१ पदकांची कमाई केली. दुसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेने चार सुवर्णपदक पटकावले. भारतीय मल्लांनी चार सुवर्ण पटकावले तर जलतरणपटूंनी चार सुवर्ण व तीन रौप्य पदकांची कमाई केली. सकाळच्या सत्रात सायकलिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण व दोन रौप्य पदकांची कमाई केली होती.

सायकलिंगमध्ये सुसाट
भारताने शनिवारी सॅग स्पर्धेच्या सायकलिंगमध्ये दोन्ही सुवर्णपदके आणि दोन रौप्यपदके आपल्या नावावर केली. महिलांच्या ३0 कि.मी. व्यक्तिगत टाईम ट्रायलमध्ये तोरांगम विद्यालक्ष्मीने ४९ मिनिटे २४.५७३ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले.
मणिपूरची इलांगबाम चाओबादेवी दुसऱ्या स्थानावर राहिली. पाकिस्तानची साहिबा बीबीने कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या ४0 किलोमीटर व्यक्तिगत टाईम ट्रायलमध्ये अरविंद पवार याने ५२ मिनिटे २८.८00 सेकंदांचा वेळ नोंदवून सुवर्णपदकावर कब्जा केला.
मनजितसिंगला रौप्यपदक मिळाले. श्रीलंकेच्या जनाका हेमंता कुमारा याला कांस्यपदक मिळाले.

तिरंदाजी :चार सुवर्ण, चार रौप्यपदके निश्चित
येथे झालेल्या तिरंदाजी स्पर्धेत व्यक्तिगत रिकर्व आणि कम्पाउंड प्रकारात भारतीय खेळाडूंनी चार सुवर्ण आणि चार रौप्यपदके निश्चित केली.
‘सॅग’चा गत चॅम्पियन तरुणदीप रॉय आणि गुरुचरण बेसरा यांनी सकाळच्या सत्रात जागतिक अव्वल दर्जाची तिरंदाज दीपिकाकुमारी आणि बोम्बाल्यादेवी लॅशराम यांच्यासोबत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात रिकर्वच्या फायनलमध्ये स्थान मिळविले. दुपारच्या सत्रात अभिषेक वर्मा आणि रजत चौहान यांनी कम्पाउंड प्रकारात पुरुष गटात, तर पूर्वाशा शेंडे आणि ज्योती सुरेखा यांनी महिला गटातून अंतिम फेरी गाठली.
व्यक्तिगत कम्पाउंड आणि रिकर्व फायनलमध्ये भारतीय खेळाडूंमध्येच स्पर्धा होणार असल्याने भारताची चार सुवर्ण आणि चार रौप्यपदके निश्चित झाली आहेत. ८ व ९ फेब्रुवारीला अंतिम फेरी होईल. त्यानतंर पदकांची संख्या निश्चित होईल.

जलतरण : एकूण सात पदके, नोंदवले तीन स्पर्धा विक्रम
भारताने १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत जलतरणामध्ये पहिल्या दिवशी श्रीलंकेचे कडवे आव्हान मोडून काढताना तीन नव्या विक्रमासह चार सुवर्ण व तीन रौप्य पदकांची कमाई केली.
संदीप सेजवाल (२०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक) आणि शिवानी कटारिया (महिला २०० मीटर फ्रीस्टाईल) यांच्या व्यतिरिक्त महिला १०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघाने नवा स्पर्धा विक्रम नोंदवला. दामिनी गौडाने महिलांच्या १०० मीटर बटरफ्लायमध्ये भारताला दिवसातील चौथे सुवर्णपदक पटाकवून दिले.

Web Title: India's dominance over the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.