भारतीय महिला बॉक्सर्सनी तुर्कीतील इस्ताम्बुल येथे जिंकली ९ पदके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 04:56 AM2017-09-18T04:56:56+5:302017-09-18T04:56:58+5:30

भारताने तुर्कीतील इस्ताम्बुल येथे युवा महिलांच्या अहमद कामरेट बॉक्सिंग स्पर्धेत १ सुवर्ण, चार रौप्य आणि चार कास्य अशा ९ पदकांची लूट केली.

Indian boxers won 9 medals at Istanbul in Turkey | भारतीय महिला बॉक्सर्सनी तुर्कीतील इस्ताम्बुल येथे जिंकली ९ पदके

भारतीय महिला बॉक्सर्सनी तुर्कीतील इस्ताम्बुल येथे जिंकली ९ पदके

Next


नवी दिल्ली : भारताने तुर्कीतील इस्ताम्बुल येथे युवा महिलांच्या अहमद कामरेट बॉक्सिंग स्पर्धेत १ सुवर्ण, चार रौप्य आणि चार कास्य अशा ९ पदकांची लूट केली.
भारताच्या सोनिया हिने ४८ किलो वजन गटात अंतिम फेरीत कजाखस्तानच्या जाजिरा उराकाबेव्हा हिला नमवताना भारतातर्फे एकमेव सुवर्णपदक जिंकले. भारतातर्फे आपापल्या लढती जिंकून अंतिम फेरी गाठणा-या चार खेळाडूंना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताकडून निहारिका गोनेला (७५ किलो), शशी चोपडा (५७ किलो), परवीन (५४ किलो) आणि अंकुशिता बोरो (६४) यांनी रौप्यपदक जिंकले. त्याआधी तिलोतमा चानू (६0 किलो), ज्योती गुलिया (४८ किलो), ललिता (६४ किलो) आणि मनीषा (६९ किलो) यांनी कास्यपदक जिंकले. या खेळाडूंना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. 

Web Title: Indian boxers won 9 medals at Istanbul in Turkey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.