भारताने पाडला मालदीवचा १५-० ने फडशा

By admin | Published: September 15, 2014 02:21 AM2014-09-15T02:21:53+5:302014-09-15T02:21:53+5:30

सुश्मिता मलिक आणि कमला देवी (प्रत्येकी पाच गोल) यांच्या शानदार गोलच्या बळावर भारतीय महिला फुटबॉल संघाने आशियाई स्पर्धेत मालदीवचा १५-० असा धुव्वा उडवीत सलामी दिली़

India defeated Maldives by 15-0 goals | भारताने पाडला मालदीवचा १५-० ने फडशा

भारताने पाडला मालदीवचा १५-० ने फडशा

Next

इंचियोन : सुश्मिता मलिक आणि कमला देवी (प्रत्येकी पाच गोल) यांच्या शानदार गोलच्या बळावर भारतीय महिला फुटबॉल संघाने आशियाई स्पर्धेत मालदीवचा १५-० असा धुव्वा उडवीत सलामी दिली़
भारताकडून सुश्मिता आणि कमला देवी यांच्यासह स्ट्राईकर बाला देवी हिने दोन गोल नोंदविले, तर कर्णधार बेमबेम देवी, स्ट्राईकर परमेश्वरी देवी आणि डिफेंडर आशालता देवी यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात योगदान दिले़ आजच्या विजयासह भारतीय महिला संघ जवळपास स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे़ आशियाई स्पर्धेच्या उद्घाटनाच्या एक आठवड्यापूर्वी फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला आहे़
भारतीय संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात करताना पहिल्या हाफपर्यंत ९-० अशी आघाडी मिळविली होती़ त्यानंतर सामना संपेपर्यंत सामन्यावर पूर्णपणे भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. अखेर मालदीवला या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला़
भारताने पाचव्याच मिनिटाला बेमबेमच्या पासवर सुश्मिताच्या गोलने खाते उघडले़ मिडफिल्डर कमलाने १२ व्या मिनिटाला गोल करीत २-० अशी आघाडी मिळवून दिली़ फॉर्ममध्ये असणाऱ्या बालाने पुढच्याच मिनिटाला गोल नोंदविला़ तीन मिनिटांनंतर सुश्मिताने आपला दुसरा गोल नोंदविला़
भारतीय खेळाडूंपुढे मालदीवच्या खेळाडूंचे काहीच चालले नाही़ कमलाने याचा पुरेपूर लाभ घेत २३ व्या मिनिटाला गोल केला़ त्यानंतर तिने २६ व्या मिनिटाला गोल नोंदवून हॅॅट्ट्रिक साजरी केली़ हाफटाईमपर्यंत बालाने दोन गोल केले होते, तर कमलाने आपला चौथा गोल करताना ९-० अशी आघाडी मिळवून दिली़
ब्रेकनंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला़ आशालता हिने बेमबेमच्या पासवर गोल नोंदविला़ त्यानंतर कमलाने ६६ व्या मिनिटाला आपला पाचवा गोल नोंदविला़ सुश्मिताने ८० व्या मिनिटाला फ्री किकवर गोल केला़ तिने सात मिनिटांनंतर आपला पाचवा गोल नोंदविला़
परमेश्वरी देवी हिने अतिरिक्त वेळेत आपला पहिला आणि टीमचा १५ वा गोल नोंदविला़ ही आघाडी प्रतिस्पर्धी संघाला मोडून काढता आली नाही़ (वृत्तसंस्था)

Web Title: India defeated Maldives by 15-0 goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.