भारताची चीन, यूएई, इंग्लंडवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:01 AM2018-04-22T00:01:38+5:302018-04-22T00:01:38+5:30

जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे चीन व इंग्लंड संघाचा पराभव करून खळबळ उडवून दिली.

India beat China, UAE, England | भारताची चीन, यूएई, इंग्लंडवर मात

भारताची चीन, यूएई, इंग्लंडवर मात

Next

पुणे : भारताच्या मुलांच्या अ संघाने चीनचा, मुलींच्या ब संघाने इंग्लंडचा आणि मुलींच्या अ संघाने यूएईचा पराभव करून जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे चीन व इंग्लंड संघाचा पराभव करून खळबळ उडवून दिली. मुलींच्या ग्रुप १ मध्ये पुण्याच्या तनिष्का दोपांडेने फ्रान्स आणि इंग्लंडविरुद्ध एकेरीमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत सिलेक्टेड टीम मुलांच्या ग्रुप १ मध्ये भारत अ संघाने चीनवर ४-१ गेमने पराभूत केले. दुहेरीत रितूपर्णा बोरा - पारस माथूर जोडीने जिहडिंग - जिआजून लियू जोडीवर २१-१५, २१-१२ असा विजय मिळवला. तर तरुण - वरुण त्रिखा जोडीने युफेंग काओ - हाओयिन वांग जोडीवर २१-१९, २१-१८ अशी मात करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर एकेरीत तरुणने डिंगबर २१-१२, २१-१५ अशी मात करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर चीनच्या युफेंग काओने वरुणवर १५-२१, २१-१८, २१-१९ अशी मात केली. मात्र, एकेरीतील अखेरच्या लढतीत राजकंवरने वांगवर २१-१६, २१-११ अशी मात करून भारत अ संघाला ४-१ने विजय मिळवून दिला. यानंतर सिलेक्टेड टीममध्ये मुलींच्या ग्रुप -२ मध्ये भारत अ संघाने यूएईवर ५-० गेमने ने मात केली. इतर लढतीत सिलेक्टेड टीम्समध्ये मुलींच्या ग्रुप १ मध्ये फ्रान्सने भारत ब संघावर ४-१ ने मात केली.

मला महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर नंबर वन व्हायचय, असे भारतीय ब संघाकडून खेळत असलेल्या पुण्याच्या तनिष्का देशपांडेने लोकमतला सांगितले. सकाळच्या सत्रात फ्रान्सविरूध्द खेळताना थोडे दडपण आले होते. कारन आम्ही दुहेरीमध्ये पराभूत झालो होते. माझ्यासाठी एकेरी जिंकणे म्हत्वाचे होते. विरूध्द संघाच्या खेळाडूच्या चूका हेरून मी ते दडपण झूकारून लावत विजय मिळविला. सायंकाळच्या सत्रात इंग्लंडविरूध्द आम्ही एकेतर्फी विजय नोंदविले.
-तनिष्का देशपांडे

संघातील इतर सहकारी खेळाडूंचा सुध्दा खेळ चांगला झाला. सायंकाळच्या सत्रात इंग्लंडविरूध्दचे आव्हान परतावून लावत आम्ही विजय मिळविला, असे शेवटी तनिष्का म्हणाली.

पुण्याच्या तनिष्का देशपांडेची शानदार कामगिरी
मुलींच्या ग्रुप-१ मध्ये भारत ब संघाने इंग्लंडचे आव्हान ४-१ने परतवून लावले. यात दुहेरीत वेन्नेला श्री कोकांती- अनिशा वसे जोडीने लीह अलेन - मेगन थॉमस जोडीवर २१-१५, २१-११ असा विजय मिळवला. यानंतर तनिष्का देशपांडे-वर्षा वेंकटेश जोडीने नताशा लाडो-अँजेलिना वाँग जोडीवर २१-९, १४-२१, २१-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. एकेरीत तनिष्काने अँजेलिनावर २१-५, २१-११ अशी मात करून भारताला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. वषार्ने लीहचे आव्हान २१-५, २१-११ असे परतवून लावले. एकेरीतील अखेरच्या लढतीत इंग्लंडच्या नताशाने भारताच्या अनिशावर १८-२१, २१-१३, २१-१५ असा विजय मिळवला.

Web Title: India beat China, UAE, England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.