आशियाडमध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य, जिम्नॅस्ट दीपा करमाकरची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:14 AM2018-02-27T01:14:18+5:302018-02-27T01:14:18+5:30

गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्टार जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही एप्रिल महिन्यात होणाºया गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत खेळू शकणार नाही.

 Deepika Karmakar preparing to win medal in Asia | आशियाडमध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य, जिम्नॅस्ट दीपा करमाकरची तयारी सुरू

आशियाडमध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य, जिम्नॅस्ट दीपा करमाकरची तयारी सुरू

googlenewsNext

नवी दिल्ली : गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्टार जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही एप्रिल महिन्यात होणाºया गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्यानंतर इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान आयोजित आशियाडमध्ये पदक जिंकणे हे आपले मुख्य लक्ष्य असेल, असे दीपा म्हणाली. त्यासाठी दीपाची तयारी सुरू झाली आहे.
दीपा म्हणाली,‘राष्टÑकुलमध्ये खेळू शकणार नसल्याने निराश आहे. या स्पर्धेत एक पदक जिंकण्याची आशा होती. आता आशियाडमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धाराने सरावही सुरू केला आहे.’ रिओ आॅलिम्पिकमध्ये महिलांच्या वॉल्ट प्रकारात चौथ्या स्थानावर राहिलेल्या दीपाने गुडघ्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली आहे. मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात तिच्या लिगामेंटवर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ती पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाली आहे.
दीपा पुढे म्हणाली,‘आता मी सराव सुरू केला. आशियाडपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त व्हायचे आहे. दरदिवशी दोन सत्रांत सराव करीत आहे.’ मेलबोर्न येथे झालेल्या विश्व जिम्नॅस्टिक स्पर्धेत कांस्य विजेती अरुणा रेड्डी हिचे दीपाने तोंडभरून कौतुक केले. अरुणा राष्टÑकुलमध्येही पदक जिंकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. (वृत्तसंस्था)

Web Title:  Deepika Karmakar preparing to win medal in Asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.