रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! तब्बल २० वर्षांत पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 08:20 AM2023-09-07T08:20:32+5:302023-09-07T08:22:11+5:30

Cristiano Ronaldo, Ballan D'or Award: क्रिस्टीआनो रोनाल्डो हा सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक आहे

Cristiano Ronaldo not included in Ballan D'or shortlist for first time in 20 years | रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! तब्बल २० वर्षांत पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार

रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! तब्बल २० वर्षांत पहिल्यांदाच घडला 'असा' प्रकार

googlenewsNext

Cristiano Ronaldo, Ballan D'or Award: फुटबॉल जगतातील सर्वोच्च अशा बलेन डी'ओर पुरस्कारासाठी अधिकृतरित्या काही नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली. फुटबॉलचा सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटूला दिला जातो. तब्बल 5 वेळा हा पुरस्कार पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टीआनो रोनाल्डो याने जिंकला आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे यंदाच्या नामांकनांच्या यादीत त्याला स्थान मिळालेले नाही. गेल्या २० वर्षात पहिल्यांदाच रोनाल्डोच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे.

फ्रान्स फुटबॉल मासिकाने बुधवारी नामांकन जाहीर केल्यानंतर 2023 च्या बॅलन डी'ओर पुरस्कारासाठी 30 खेळाडूंच्या यादीत लिओनेल मेस्सी आणि एर्लिंग हॅलँड आघाडीवर आहेत. मेस्सीचे नामांकन त्याला शॉर्टलिस्टमधून वगळल्यानंतर एका वर्षानंतर आले आहे. त्याने या वर्षी पुरुषांचा बॅलोन डी'ओर जिंकला तर हा पुरस्कार त्याच्या आठवा किताब ठरेल. या यादीत पाच किताबांसह क्रिस्टियानो रोनाल्डो दुसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारीमध्ये, मेस्सीने दुसऱ्यांदा सर्वोत्तम फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कारही जिंकला होता.

सौदी अरेबियात अल नासरसाठी खेळणाऱ्या रोनाल्डोला 2003 नंतर प्रथमच या शॉर्टलिस्टच्या यादीतून वगळण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर रोजी पॅरिसमधील थिएटर डू चॅटलेट येथे होणाऱ्या समारंभात या पुरस्कार विजेत्याची घोषणा केली जाईल. मेस्सीने डिसेंबरमध्ये अर्जेंटिनाला 2022 चा विश्वचषक जिंकून दिला. त्याच्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत अखेर पाचव्या प्रयत्नात त्याला मिळाली. मात्र यंदाचा बॅलेन डी'ओर पुरस्कार मेस्सीला मिळणार की आणखी कुणाला, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.

 

 

Web Title: Cristiano Ronaldo not included in Ballan D'or shortlist for first time in 20 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.