चानूचा सुवर्ण पराक्रम, जागतिक भारोत्तोलन, मल्लेश्वरीनंतर २२ वर्षांनी विश्वविक्रमाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:41 AM2017-12-01T01:41:37+5:302017-12-01T01:41:53+5:30

भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला.

 Chanu's gold feat, world weightlifting, world record 22 years after Malleswari | चानूचा सुवर्ण पराक्रम, जागतिक भारोत्तोलन, मल्लेश्वरीनंतर २२ वर्षांनी विश्वविक्रमाला गवसणी

चानूचा सुवर्ण पराक्रम, जागतिक भारोत्तोलन, मल्लेश्वरीनंतर २२ वर्षांनी विश्वविक्रमाला गवसणी

Next

नवी दिल्ली : भारताची महिला भारोत्तोलक मीराबाई चानूने जागतिक भारोत्तोलन (वेटलिफ्टिंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करीत सुवर्ण पदकाची कमाई केली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला. भारोत्तोलन स्पर्धेत पदकाची कमाई करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. २२ वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.
यामुळे रिओ आॅलिम्पिकमधील खराब कामगिरीची तिची नाराजीदेखील दूर झाली. राष्टÑगीताची धून वाजताच भारतीय रेल्वेची खेळाडू असलेल्या मीराबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आॅलिम्पिक कांस्य विजेती कर्णम मल्लेश्वरी हिने याआधी १९९४ आणि १९९५ मध्ये विश्व स्पर्धेचे सुवर्ण जिंकले होते. चानू रिओ आॅलिम्पिकच्या तिन्ही प्रयत्नांत अपयशी ठरली होती. १२ खेळाडूंचा समावेश असलेल्या या प्रकारात ज्या दोन खेळाडू स्पर्धा पूर्ण करू शकल्या नव्हत्या, त्यात चानू एक होती. आज थायलंडची सुकराचोन हिला रौप्य आणि सेगुरा इरिसने कांस्य जिंकले. डोपिंग प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्तान, युक्रेन आणि अझरबैजान येथील भारोत्तोलक या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नाहीत.

राष्टÑपती, पंतप्रधानांकडून अभिनंदन

सुवर्ण विजेती भारोत्तोलक साइखोम मीराबाई चानू हिचे राष्टÑपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
‘भारताला मीराबाईच्या कामगिरीचा अभिमान आहे. त्यासाठी तिचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा,’ असे मोदी यांनी टिष्ट्वट केले. ‘देशाला चॅम्पियन देणाºया मणिपूरचे आणि विश्व पराक्रमी मीराबाईचे अभिनंदन’, असे राष्टÑपतींनी म्हटले आहे.

मीराबाईचे अभिनंदन करणाºयांमध्ये क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड, पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरीकोम, आॅलिम्पिक पदक विजेता बॉक्सर विजेंदरसिंग यांचा समावेश आहे.
भारतीय भारोत्तोलन महासंघाचे महासचिव सहदेव यादव म्हणाले,‘ही आॅलिम्पिकपेक्षा मोठी उपलब्धी आहे. विश्व स्पर्धेत अतिषय अवघड आव्हान असते. त्यासाठी मीराबाई आणि कोच विजय शर्मा अभिनंदनास पात्र आहेत.

आज मी जे काही मिळवले आहे, ते प्रशिक्षक विजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाशिवाय शक्य झाले नसते. मी आणि माझ्या प्रशिक्षकांनी उच्च स्तरावर यशस्वी होण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नव्हती. रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील अपयश माझ्यासाठी खूप निराशाजनक होते. मी रिओला चुका केल्या होत्या आणि अजूनही ती गोष्ट सलत आहे. मात्र, या पदकाने ती निराशा दूर झाली आहे. आता मी माझ्या कमजोर बाजूंकडे अधिक लक्ष देईल आणि आगामी राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा तसेच टोकिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकाण्याचा पुर्ण प्रयत्न करेल.
- मीराबाई चानू

Web Title:  Chanu's gold feat, world weightlifting, world record 22 years after Malleswari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.