कॅरम : महाराष्ट्राच्या मुलांना सांघिक विजेतेपद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:02 PM2019-03-31T18:02:46+5:302019-03-31T18:03:19+5:30

आकांक्षा कदम सब जुनिअर राष्ट्रीय विजेती

Carrom: Maharashtra's team won title | कॅरम : महाराष्ट्राच्या मुलांना सांघिक विजेतेपद 

कॅरम : महाराष्ट्राच्या मुलांना सांघिक विजेतेपद 

Next

मुंबई : वाराणसी येथे झालेल्या उत्तर प्रदेश कॅरम ओसिएशन व वाराणसी कॅरम असोसिएशनच्या यजमानपदाखाली अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित सब जुनिअर राष्ट्रीय व आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या १४ वर्षंखालील गटात महाराष्ट्राच्या आकांक्षा कदमने तामिळनाडूच्या आर. मोनिशाचा २१-०, १२-१० सहज असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. आकांक्षाच्या खेळामध्ये यावेळी चांगलाच आक्रमकपणा पाहायला मिळाला. कारण पहिल्या सेटमध्ये तिने मोनिशाला एकही गुण मिळवायला दिला नाही आणि हा सेट २१-० असा जिंकला. त्यावेळीच आकांक्षा हा सामना जिंकेल, असे वाटत होते. आकांक्षाने दुसरा सेटही १२-१० असा जिंकत जेतेपदाला गवसणी घातली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तामिळनाडूच्या एम. खाजिमाने तामिळनाडूच्याच एस अस्वीकाचा ९-०३, ११-२१, २१-४ विजय संपादन केला.    
१४ वर्षंखालील मुलांच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या एन मिथुनने  उत्तर प्रदेशच्या मोईनुद्दीनचा १५-१, १४-१० असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत आर.  सिथिक राजा ( तामिळनाडू ) ने एम कौशिक ( तामिळनाडू ) याचा १९-५, १३-९ असा प्रभाव करून तिसरा क्रमांक पटकाविला. 
सांघिक गटात महाराष्ट्राच्या मुलांनी बाजी मारली महाराष्ट्राने तामिळनाडूचा २-१ असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उत्तर प्रदेशचा संघ विजयी ठरला त्यांनी पॉंडिचेरीचा ३-० असा सहज पराभव केला. मुलींच्या सांघिक अंतिम फेरीत मात्र तामिळनाडूच्या संघाने महाराष्ट्राला २-१ अशी हुलकावणी दिली. महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलींच्या सांघिक गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये बिहारने बाजी मारली. त्यांनी उत्तर प्रदेशला २-१ असे पराभूत केले. 
१२ वर्षाखालील कॅडेट मुलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या एस. नवीनकुमारने महाराष्ट्राच्या नीलांश चिपळूणकरचा ५-२०, २०-१९, २०-१८ असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. तर कॅडेट मुलींच्या एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या व्ही. मिथराने महाराष्ट्राच्या मधुरा देवळेवर १६-१०, १४-१२ असा सरळ दोन सेटमध्ये विजय संपादन केला व या गटाचे विजेतेपद मिळविले. विजेत्यांना चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Carrom: Maharashtra's team won title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.