कॅरम : संदिप देवरुखकर आणि संगीता चांदोरकर अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 09:15 PM2019-02-19T21:15:42+5:302019-02-19T21:16:27+5:30

राष्ट्रीय विजेती रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरने प्रिती खेडेकरची २५-१९, ११-२५, २५-१६ अशी कडवी झुंज मोडीत काढली.

Carom: Sandeep Devrukhkar and Sangeeta Chandorkar won title | कॅरम : संदिप देवरुखकर आणि संगीता चांदोरकर अजिंक्य

कॅरम : संदिप देवरुखकर आणि संगीता चांदोरकर अजिंक्य

Next

मुंबई : द. बॉम्बे यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनने आयोजित केलेल्या मुथूट फायनान्स पुरस्कृत प्रतिष्ठेच्या मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम गुणांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी गटामध्ये अनुक्रमे ओ. एन. जी. सी.च्या बिनमानांकित संदिप देवरुखकर व माजी राज्य व राष्ट्रीय विजेती रिझर्व्ह बँकेच्या  संगीता चांदोरकर यांनी विजेतेपदाला गवसणी घातली.
 
पुरुष एकेरीच्या अंतिम  फेरीच्या एक तास दोन गेम रंगलेल्या एकतर्फी सामन्यात ओ. एन. जी. सी.च्या संदिप देवरुखकरने चौथा मानांकित जागतिक व विश्व विजेता रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेचा २५-११, २५-० असा फाडशा पाहत विजेतेपदाचा मानकरी ठरला. पहिल्या गेममध्ये अप्रतिम शॉटस्‌ची आतषबाजी व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत संदिप देवरुखकरने पाचव्या बोर्डपर्यंत २०-११ अशी आघाडी घेत नंतरच्या बोर्डमध्ये ५ गुण मिळवून २५-११ असा पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये संदिप देवरुखकरने आपल्या ब्रेकमध्ये १२ चा बोर्ड मिळवून १२-० अशी अशघाडी घेतली. नंतरच्या प्रशांत मोरेच्या ब्रेकमध्ये ११ गुणांचा बोर्ड जिंकून २१-० अशी आघाडी घेतली. प्रशांत मोरेला सूर गवसला नसल्यामुळे संदिप देवरुखकरच्या ब्रेकमध्ये ४ गुण घेऊन २५-० असा दुसरा गेम जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओ. एन. जी. सी.च्या संदिप देवरुखकरने दोन गेम रंगलेल्या लढतीत बृहन्मुबई महानगरपालिकेच्या गिरीष तांबेला २५-७, २५-१५ असे निष्प्रभ करत अंतीम फेरी गाठली.  नमवून अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चौथा मानांकित रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने तीन गेम रंगलेल्या लढतीत एअर इंडियाच्या झाहिर अहमदचा २५-१७, २५-१६ असे नमवित अंतीम फेरीत प्रवेश मिळविला. 


महिला एकेरी गटाच्या अंतीम फेरीच्या तीन तास रंगलेल्या सामन्यात माजी राज्य व राष्ट्रीय विजेती रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरने दुसऱ्या मानांकित सी. डी. ए. नेव्हीच्या प्रीति खेडेकरचा २५-१९, ११-२५, २५-१६ अशी कडवी झुंज मोडीत काढून विजेतेपदावर नाव कोरले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात द्वितीय मानांकित सी. डी. ए. नेव्हीच्या प्रीति खेडेकरने सरळ दोन गेम रंगलेल्या लढतीत शिवताराच्या सुषमा परदेशीचा २५-६, २५-९ असे नमवून अंतिम फेरी गाठली. रिझर्व्ह बँकेच्या अग्रमानांकित संगीता चांदोरकरने अटीतटीच्या दोन गेम रंगलेल्या लढीत आयुर्विमा महामंडळाच्या माजी राज्य विजेती शिल्पा पलनीटकरचा २५-१८, २५-१३ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. 


तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण आठ ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिशची नोंद झाली. या स्पर्धेमध्ये एकाच वेळी २४ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिसका कॅरम बोर्डस्‌ व अश्विन कॅरम सोंगट्या वापरण्यात आल्या.या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कॅरम पंच श्री. जनार्धन संगम (मुंबई) व त्यांचे सहाय्यक पंच म्हणून श्री. सुनिल खेमकर यांनी उत्कृष्ट संचलन केले.

Web Title: Carom: Sandeep Devrukhkar and Sangeeta Chandorkar won title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई