२००७ च्या वर्ल्डकपमधून बाहेर होणे वाईट क्षण

By Admin | Published: December 31, 2014 11:41 PM2014-12-31T23:41:27+5:302014-12-31T23:41:27+5:30

वेस्ट इंडीजमध्ये २००७ मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियावर लवकरच बाहेर होण्याची नामुष्की ओढवली होती़ हा क्रिकेट कारकीर्दीतील सर्वांत वाईट क्षण होता,

A bad moment to come out of the 2007 World Cup | २००७ च्या वर्ल्डकपमधून बाहेर होणे वाईट क्षण

२००७ च्या वर्ल्डकपमधून बाहेर होणे वाईट क्षण

googlenewsNext

सचिन तेंडुलकर : २०११मध्ये चांगल्या कामगिरीसाठी मिळाली प्रेरणा
दुबई : वेस्ट इंडीजमध्ये २००७ मध्ये झालेल्या वन-डे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियावर लवकरच बाहेर होण्याची नामुष्की ओढवली होती़ हा क्रिकेट कारकीर्दीतील सर्वांत वाईट क्षण होता, असे मत महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले आहे़
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये २०१५ मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसाठी (आयसीसी) लिहिलेल्या कॉलममध्ये सचिनने म्हटले की, विंडीजमधील वर्ल्डकपमध्ये आम्हाला लवकरच बाहेर व्हावे लागले होते़ यानंतर संघाला चोहोबाजूंनी टीकेचा सामना करावा लागला होता; मात्र या निराशाजनक कामगिरीमुळे आम्हाला २०११मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळाली, असेही सचिन म्हणाला़
सचिन पुढे म्हणाला, विंडीजमध्ये पराभव झाल्यानंतर भारतातील २०११ चा वर्ल्डकप जिंकावा असे माझे स्वप्न होते़ ते पूर्ण झाल्याचा आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही़ या स्पर्धेत आॅस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या अनुभवी संघांना धूळ चारून जेतेपदावर नाव कोरले़ हा क्षण माझ्यासाठी विशेष होता़ कारण तब्बल २८ वर्षांनी भारताला हे अजिंक्यपद मिळाले होते़ २५ जून १९८३ मध्ये भारताने वर्ल्डकप जिंकला तेव्हा मी अवघ्या १० वर्षांचा होतो़ तेव्हा संघातील खेळाडूंचा हातात ट्रॉफी घेतलेला फोटो पूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला होता़ विशेष म्हणजे तेव्हा वडिलांनी मला पूर्ण रात्रभर आनंद साजरा करण्याची परवानगी दिली होती़ भारत आणि पाकिस्तानात १९८७ ला झालेल्या वर्ल्डकपमध्ये मी बॉलबॉयची भूमिका निभावली होती़ तेव्हाच भारतीय संघाकडून खेळण्याचे मी स्वप्न बघितले होते, असेही सचिनने या कॉलममध्ये नमूद केले़
सचिन पुढे म्हणाला, १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीत श्रीलंकेविरुद्ध मी बाद झाल्यानंतर खेळाडू एकापाठोपाठ एक बाद झाले आणि संघाला पराभवाची नामुष्की ओढवली होती़ संघाला गरज असताना बाद झाल्याचा मला आजही खेद वाटतो़ १९९९चा वर्ल्डकप तर माझी परीक्षा बघणारा ठरला़ कारण याच वर्ल्डकपदरम्यान वडिलांचे निधन झाले होते, असेही सचिनने सांगितले़

Web Title: A bad moment to come out of the 2007 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.