पदक जिंकण्याच्या निर्धारानेच आशियाडची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 04:21 AM2018-05-17T04:21:01+5:302018-05-17T04:21:01+5:30

गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अपयशानंतर जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या आशियाडमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या निर्धारानेच तयारी सुरू असल्याचे युवा आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे याचे मत आहे.

Asian preparations are only due to the medal tally | पदक जिंकण्याच्या निर्धारानेच आशियाडची तयारी

पदक जिंकण्याच्या निर्धारानेच आशियाडची तयारी

googlenewsNext

नागपूर : गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील अपयशानंतर जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या आशियाडमध्ये देशाला पदक मिळवून देण्याच्या निर्धारानेच तयारी सुरू असल्याचे युवा आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे याचे मत आहे. वयाच्या १६ व्या वर्षी
२००९च्या आॅलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा अर्जुन पुरस्कारप्राप्त वीरधवल बेंगळुरू येथील राष्टÑीय शिबिरात सराव
करीत आहे. व्यस्ततेतून वेळ काढून खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या जलतरण स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तो बुधवारी नागपुरात होता.
पत्रकारांशी संवाद साधताना तहसीलदार पदावर कार्यरत वीरधवल म्हणाला, ‘अपुºया सरावामुळे माझ्यासाठी राष्टÑकुल स्पर्धा चांगला अनुभव नव्हता. मालवण येथे त्यावेळी माझी नियुक्ती होती. तेथे सरावाची पुरेसी सोय नसल्याने स्पर्धेत चांगली कामगिरी झाली नव्हती, पण आशियाडमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धारानेच उतरणार आहे.’
खाडे ५० मीटर फ्री स्टाईल आणि बटर फ्लाय तसेच १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्टÑकुल आणि आशियाडमध्ये सारखीच चढाओढ असल्याचे सांगून मला ५० मीटर प्रकारात पदकाची अपेक्षा असल्याचा विश्वास २०१० च्या आशियाडमध्ये कांस्य पदक जिंकणाºया वीरधवलने व्यक्त केला.
>आॅलिम्पिकचा
प्रवास नागपुरातून...
२००५ साली वयाच्या १४ व्या वर्षी सिनियर राज्य स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत वीरधवल पहिल्यांदा नागपुरात पोहला. या शहराशी माझ्या गोड आठवणी जुळल्या असल्याचे सांगून तो म्हणाला, ‘माझा आॅलिम्पिकचा प्रवास नागपुरातून सुरू झाला. दुसºयांदा २०१५ मध्ये राज्य वरिष्ठ स्पर्धेसाठी पुन्हा नागपुरात पोहलो. आता २०२० च्या आॅलिम्पिकसाठी हे शहर ‘लकी’ ठरेल, अशी आशा आहे. १५ वर्षांच्या करिअरमध्ये वीरधवलने साऊथ एशियन गेम्समध्ये सहा सुवर्णांसह तीन स्पर्धा विक्रम नोंदविले आहेत. युवा खेळाडूंनी पाच ते सहा वर्षे संयम राखून खडतर सराव केल्यास आंतरराष्टÑीय पदके मिळविणे कठीण नसल्याचे दररोज १५ तास पोहणाºया वीरधवलने सांगितले.
सिनियर स्तरावर अधिक स्पर्धा हवी
देशात जलतरणाच्या अपुºया पायाभूत सुविधा असल्याबद्दल खंत व्यक्त करीत सिनियर
स्तरावरील स्पर्धांची संख्याही कमीअसल्याचे वीरधवलचे मत आहे.
ज्युनियर स्तरावर चढाओढ असताना सिनियर स्तरावर स्पर्धा नसल्याने स्वत:ला सिद्ध करण्याची संधी कमी आहे. जलतरणात देशाला भरपूर पदके मिळू शकतात पण त्यासाठी सरकार आणि कार्पोरेटस्ने पुढाकार घेत सरावाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या, असे तो म्हणाला.
जलतरणपटू संभ्रमात...
जलतरण फेडरेशनने महाराष्टÑ संघटनेला अपात्र घोषित केल्याचा फटका जलतरणपटूंना बसत आहे. खेळाडू आणि पालकांना नेमके काय करावे हे कळेनासे झाले आहे.
जलतरणपटूंचे करियर संपणार नाही, यासाठी संघटनांच्या पदाधिकाºयांनी परस्परांतील
मतभेद लवकर दूर करावेत, असे वीरधवलने आवाहन केले.

Web Title: Asian preparations are only due to the medal tally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.