सायक्लोथॉन स्पर्धेत 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 07:52 PM2019-01-27T19:52:30+5:302019-01-27T19:52:59+5:30

शहरात शिकणाऱ्या विविध शाळातील 1500 मुलांनी तर 500 मुलींनी सायक्लोथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.

2000 students participate in cyclothon competition | सायक्लोथॉन स्पर्धेत 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग

सायक्लोथॉन स्पर्धेत 2000 विद्यार्थ्यांचा सहभाग

Next

मीरारोड - आज रविवार दि. 27 जानेवारी रोजी मीरा रोड येथे 8 ते 18 वयोगटातील शालेय मुला-मुलींसाठी आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेत 2000 विध्यार्थ्यानी सहभाग घेतला .  

सकाळी 6 वाजल्यापासून  सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले होते .  8 ते 11 पहिला वयोगट, 12 ते 15 दुसरा वयोगट तर 16 ते 18 तिसरा वयोगटामध्ये ही सायकल स्पर्धा घेण्यात आली. मुला मुलींसाठी वेगवेगळ्या तीन गटात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांना मेडल तसेच सहभागी स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. 
महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस चे  सरचिटणीस माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत मीरा भाईंदर शहरात शिकणाऱ्या विविध शाळातील 1500 मुलांनी तर 500 मुलींनी सायक्लोथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.

Web Title: 2000 students participate in cyclothon competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.