पनवेलमधील मतदारांची होणार पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:21 AM2018-07-24T03:21:07+5:302018-07-24T03:22:18+5:30

दुबारसह मृतांची नावे वगळण्यात येणार; नवीन नोंदणीही सुरू

Verification of voters in Panvel | पनवेलमधील मतदारांची होणार पडताळणी

पनवेलमधील मतदारांची होणार पडताळणी

Next

पनवेल : तालुक्यातील नवीन मतदारांनी जास्तीत जास्त मतदान नोंदणी प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पूर्वतयारी सुरू केली आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी आयोगाने नवमतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ४९६ मतदान केंद्रांचा समावेश होता. पनवेलमध्ये ५ लाख १0 हजार २0६ मतदार आहेत. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरी भागात एका यादी भागात १४00 पेक्षा जास्त व ग्रामीण भागात १२00 पेक्षा जास्त मतदार संख्या असतील तर मतदान केंद्राचे विभाजन करण्यास आयोगाने कळविले आहे. त्यामुळे ५६३ मतदान केंद्रे झालेली आहेत. पनवेल तालुक्यात ९९९ दिव्यांग मतदार आढळून आलेले आहेत. त्यामधील ७६१ दिव्यांग मतदारांची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यात आलेली आहे, तसेच उर्वरित दिव्यांग मतदारांची नावनोंदणी करण्याची कारवाई चालू असल्याचे नवले यांनी सांगितले. २३ हजार ५६ मतदारांचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहेत. त्यापैकी ३ हजार ४५६ मतदाराचे रंगीत फोटो घेण्यात आले आहेत. भविष्यातील आपली लोकशाही बळकट बनविणे याकरिता भारत निवडणूक आयोगाने इयत्ता ७ वी ते १0 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भविष्य मतदान क्लबची स्थापना करण्यात आली आहे. तसेच मतदान आपला हक्क आहे आणि तो आपण बजावला पाहिजे याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यामधील व्ही.के. हायस्कूल, डी.ए.व्ही. स्कूल, सी. के. टी. स्कूल नवीन पनवेल, बांठिया स्कूल या चार शाळांची क्लबसाठी निवड केली आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत बीएलओ मृत, स्थलांतरित व दुबार नावे असलेल्या मतदारांची माहिती संकलित करतील. त्यानंतर संबंधितांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही केली जाईल.
मतदार यादीत ज्यांचे नाव व पत्ता चुकला आहे त्यांना दुरुस्ती करता येईल. ही माहिती ईआरओ नेट प्रणालीतून अद्ययावत करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. हे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र २0 जून रोजी बीएलओंना स्वत: सादर करावे लागेल. त्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती सादर करतील. मोहिमेदरम्यान निवडणूक आयोगाचे त्यांच्याकडून दोन रंगीत फोटो घेण्याचे काम सुरु आहे.
वरिष्ठ अधिकारी कामाची पाहणी करण्याची शक्यता आहे. मयत असलेले, दुबार नावे व स्थलांतरित झालेल्यांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.

Web Title: Verification of voters in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.