पनवेलमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात,

By नारायण जाधव | Published: March 1, 2024 09:45 AM2024-03-01T09:45:17+5:302024-03-01T09:45:38+5:30

पनवेल शहरात आणि तालुक्यात आज सकाळी एक मार्च पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आंब्याचा मोहोर, कडधान्याच्या पीकाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Unseasonal rains begin in Panvel, | पनवेलमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात,

पनवेलमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात,

मयूर तांबडे/ नवीन पनवेल : पनवेल शहरात आणि तालुक्यात आज सकाळी एक मार्च पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आंब्याचा मोहोर, कडधान्याच्या पीकाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एक मार्च रोजी सकाळपासून पनवेल मध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अनेकांना सकाळी कामावर जायचे असल्याने त्यांना छत्री आणि रेनकोट घेऊन जावे लागले. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील छत्री घेऊन शाळेत जावे लागले. अवकाळी पावसाचा फटका आंब्याच्या मोहराला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच वाल, हरभरा,मूग  यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाताचा पेंडा देखील या पावसामुळे भिजला आहे. हा अवकाळी पाऊस नुकसानकारक असल्याचे अनेकांचे मत आहे.

Web Title: Unseasonal rains begin in Panvel,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.