स्थायी सामित्यांवरून भाजपाचे दोन नगरसेवक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:07 AM2017-10-03T02:07:59+5:302017-10-03T02:08:03+5:30

शहर महापालिकेच्या विषय समिती सभापतीपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र या स्थायी सामित्यांवरून भाजपचे दोन नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Two BJP corporators resentful over standing positions | स्थायी सामित्यांवरून भाजपाचे दोन नगरसेवक नाराज

स्थायी सामित्यांवरून भाजपाचे दोन नगरसेवक नाराज

googlenewsNext

मयूर तांबडे
पनवेल : शहर महापालिकेच्या विषय समिती सभापतीपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मात्र या स्थायी सामित्यांवरून भाजपचे दोन नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे. भाजपचे मनोहर म्हात्रे व एकनाथ गायकवाड हे दोन नगरसेवक नाराज आहेत. एकनाथ गायकवाड यांनी खांदा वसाहत भाजप शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देखील दिलेला आहे.
पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आरोग्य, महिला व बालकल्याण, वित्त, सांस्कृतिक कार्यक्र म व क्र ीडा, समाजकल्याण झोपडपट्टी सुधार या समित्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांचा समावेश होणार आहे. याशिवाय प्रभाग समिती समित्यांचेही सभापती व उपसभापती यांची निवड केली जाणार आहे. पालिकेच्या सभागृह नेतेपदी परेश ठाकूर यांची नियुक्ती केली गेली आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपने वर्चस्व राखले.
स्थायी समितीवर भाजपच्या वाट्याला १० तर शेकाप आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. भाजपकडून स्थायी समितीवर नगरसेवक परेश ठाकूर, संतोष भोईर, नेत्रा पाटील, रामजी बेरा, अमर पाटील, गोपीनाथ भगत, कुसुम म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संजय भोपी, तेजस कांडपीळे यांची निवड झाली. तर शेकाप आघाडीकडून नगरसेवक प्रीतम म्हात्रे, डॉ सुरेखा मोहोकर, गिरीश केणी, भारती चौधरी, गोपाळ भगत, सतीश पाटील यांची निवड झाली. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेले पद म्हणून स्थायी समिती सभापतीकडे पहिले जाते. त्यामुळे या पदावर आपलीच वर्णी लागावी यासाठी भाजपमधून अनेक जण इच्छुक होते.
स्थायी समिती सभापतीपदी कळंबोली येथील नगरसेवक अमर पाटील यांना संधी देण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या दिवशी त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. मात्र या पदावरून भाजपचे मनोहर म्हात्रे व एकनाथ गायकवाड हे दोन नगरसेवक नाराज झाले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलहाला सुरु वात झाली असल्याचे दिसून येत आहे.
अमर पाटील यांच्या नावाला भाजपमधूनच विरोध होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत भाजपचे नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अमर पाटील यांचे नाव न घेता स्थायी समितीच्या सभापतीच्या
सह्या घेण्यासाठी मुंबईच्या बारमध्ये जावे लागेल, असा टोला
लगावला.

Web Title: Two BJP corporators resentful over standing positions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.