रोजच्या मारहाणीला कंटाळून गळाच घोटला; रस्त्यालगत आढळला होता मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 09:13 AM2024-04-15T09:13:16+5:302024-04-15T09:13:31+5:30

पैशांसाठी रोज होणाऱ्या मारहाणीला कंटाळून बेघर व्यक्तीने मारहाण करणाऱ्याचा गळा घोटळ्याची घटना समोर आली.

Suffocated by daily beatings body was found by the road | रोजच्या मारहाणीला कंटाळून गळाच घोटला; रस्त्यालगत आढळला होता मृतदेह

रोजच्या मारहाणीला कंटाळून गळाच घोटला; रस्त्यालगत आढळला होता मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पैशांसाठी रोज होणाऱ्या मारहाणीला कंटाळून बेघर व्यक्तीने मारहाण करणाऱ्याचा गळा घोटळ्याची घटना समोर आली. नेरुळ येथे बेवारस मृतदेह आढळून आला. याप्रकरणी करून मनोजकुमार प्रजापती (४५) याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली. 

नेरुळ सेक्टर १० येथे रस्त्यालगत शनिवारी सकाळी ४५ ते ५० वयाची व्यक्ती मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर घाव होते. नेरुळ पोलिस ठाण्यात अज्ञातावर हत्येच्या गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. मृत व्यक्ती व मारेकरी दोघेही बेघर असून येथील रेल्वेपूल परिसरात राहत होते, तर मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून ती व्यक्ती मराठी बोलणारी होती, एवढे मारेकऱ्यामार्फत समोर आले आहे. 

सळईने हल्ला
- मृत व्यक्ती रोज पहाटेच्या वेळी प्रजापती याच्याकडे येऊन त्याला मारहाण करून पैशाची मागणी करत असते, शिवाय त्याच्याकडील पैसेही लुटून नेत असे.
- शनिवारी पहाटेही ती व्यक्ती प्रजापतीकडे पैसे मागण्यासाठी आली असता, रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या प्रजापतीने सळईने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो रक्तबंबाळ होऊन कोसळताच हल्लेखोराने तेथून पळ काढला.

Web Title: Suffocated by daily beatings body was found by the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.