रस्ते सफाईसाठी पनवेल पालिका घेणार स्कीटकेअर लोडर मशिन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:52 AM2018-03-10T06:52:55+5:302018-03-10T06:52:55+5:30

 Skeletcar loader machine to take the Panvel municipality for cleaning the roads | रस्ते सफाईसाठी पनवेल पालिका घेणार स्कीटकेअर लोडर मशिन 

रस्ते सफाईसाठी पनवेल पालिका घेणार स्कीटकेअर लोडर मशिन 

Next

पनवेल : रस्ते सफाईसाठी पनवेल महापालिका अद्ययावत स्कीटकेअर लोडर मशिन विकत घेणार आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेचे अधिकारी व नगरसेवकांसह गुरुवारी अद्ययावत स्कीटकेअर मशिनची माहिती घेऊन प्रात्यक्षिक पाहिले.
शहर अभियंता संजय कटेकर, नगरसेवक अरविंद म्हात्रे, नगरसेवक हरेश केणी यांनीही स्कीटकेअर मशिनची पाहणी केली. मशिनची किंमत २० लाख असून, ११ किमीचा रस्ता एक तासात ही मशिन साफ करते. विदेशी बनावटीच्या मशिनला विविध साचे जोडले जाऊ शकतात. एका मिनिटात हे साचे मशिनला जोडले जाऊ शकतात. रस्ते, गटारे यांची सफाई या मशिनद्वारे करता येऊ शकते.
मशिनद्वारे एका वेळेला ६०० किलो कचरा साठवला जाऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेत अशाप्रकारची मशिन विकत घेण्यात आली आहे. रस्ते सफाई करणाºया विविध कंपन्यांच्या मशिनची प्रात्यक्षिके आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर या मशिन खरेदीचा निर्णय घेतला जाईल. महासभेसमोर हा प्रस्ताव ठेवल्यानंतर यासंदर्भात पुढील प्रक्रि या पार केली जाईल, असे शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title:  Skeletcar loader machine to take the Panvel municipality for cleaning the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.