घरफोडी करणारे सहा आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:24 AM2017-08-04T02:24:16+5:302017-08-04T02:24:17+5:30

गुन्हे शाखेने घरफोडी करणाºया दोन टोळ्या गजाआड केल्या आहेत. यात सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दागिने, मोबाइल व २० बकरे ताब्यात घेतले आहेत.

 Six accused of burglary Ghajaad | घरफोडी करणारे सहा आरोपी गजाआड

घरफोडी करणारे सहा आरोपी गजाआड

Next

नवी मुंबई : गुन्हे शाखेने घरफोडी करणाºया दोन टोळ्या गजाआड केल्या आहेत. यात सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दागिने, मोबाइल व २० बकरे ताब्यात घेतले आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट एकने २८ जुलैला बबलू टोको कुरेशी व सोहेल हबीब शेख या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन तोळे वजनाचे दागिने, ३ मोबाइल, एक घड्याळ असा ६१ हजार रूपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. कोपरखैरणेतून प्रवीण महादेव सणस, आप्पा सणस, सुनील भोसले ऊर्फ पिंट्या व निसार कुरेशी या चौघांना अटक केली. त्यांनी ३० बकरे, महिंद्रा पिकअप असा ३ लाख २४ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

Web Title:  Six accused of burglary Ghajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.