‘फिफा’चा दुसरा सामना : महापालिकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरले स्टेडियम, पोलिसांचा चोख पहारा; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:47 AM2017-10-10T02:47:26+5:302017-10-10T02:47:42+5:30

डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या फिफा ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दहा हजार तिकिटे देण्यात आली.

The second match of FIFA: the park filled with the students of municipal school, guarded the police; Enthusiasm among students | ‘फिफा’चा दुसरा सामना : महापालिकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरले स्टेडियम, पोलिसांचा चोख पहारा; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

‘फिफा’चा दुसरा सामना : महापालिकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरले स्टेडियम, पोलिसांचा चोख पहारा; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

Next

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सुरू असलेल्या फिफा ज्युनियर विश्वचषक स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दहा हजार तिकिटे देण्यात आली. फिफाचे आयोजन करण्यात महापालिकेने यजमान म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत वॉकेथॉनचेही आयोजन केले होते.
पहिल्या दिवशीच्या ‘फ्लॉप शो’नंतर फिफाने सोमवारी झालेल्या दुसºया सामन्यांकरिता महापालिका विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. सोमवारी तुर्की विरु द्ध माली व पेरु ग्वे विरु द्ध न्यूझिलंड यांचे सामने झाले. आठवड्याचा पहिला दिवस त्यातच पावसाची चिन्हे दिसल्याने दुसºया सामन्यालाही कमी प्रतिसाद मिळेल अशी भीती होती. मात्र महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने स्टेडियम भरलेले दिसले.
एनएमएमटी बसेसमधून महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना स्टेडियमपर्यंत सोडण्यात आले. यावेळी प्रवेश करण्याआधी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात होती. शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून सूचना देत शिस्तबध्द रांगेत आत सोडण्यात आले. यावेळी फिफाच्या माध्यमातून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल सामने होणार असल्याने महापालिकेने यजमान शहराची जबाबदारी स्वीकारत शहराचा कायापालट केला. या माध्यमातून चकाचक रस्ते, नीटनेटके पदपथ, सुसज्ज उद्याने व सौंदर्यीकरण करण्यात आले.
वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी दहा हजार विद्यार्थ्यांना फुटबॉलच्या सामन्यांची मोफत तिकिटे देण्याची मागणी महापालिकेने फिफाकडे केली होती. पण त्याची त्यांनी दखल घेतली नव्हती; परंतु शुक्रवारच्या पहिल्या सामन्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत तिकिटे देण्यात आली. पहिल्या सामन्याला विक्री झालेल्या तिकिटांपेक्षा कमी प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले होते. दुपारनंतर वातावरणात काहीसा बदल झाला, पण पाऊस आला नाही त्यामुळे अनेकांनी फुटबॉलच्या सामन्यांसाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावी. आठवड्याचा पहिला दिवस आणि सुटी नसल्याने नोकरदार वर्गाची संख्या कमी होती.
संपूर्ण स्टेडियम व त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून गैरप्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ ध्वनिक्षेपकांद्वारे पोलिसांकडून वेळोवेळी विस्तृत सूचना दिल्या जात होत्या. सामने पाहण्यासाठी येणाºया प्रेक्षकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, कुणी अफवा पसरवत असल्यास त्यांची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, स्थानिक पोलीस ठाणे अथवा बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना द्यावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. सामने सुरू होण्यापूर्वी देखील येणाºया प्रेक्षकांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास, कुणी व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळल्यास तत्काळ त्याची माहिती पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

Web Title: The second match of FIFA: the park filled with the students of municipal school, guarded the police; Enthusiasm among students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.