एपीएमसीत एमडीसह पिस्तूल केले जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:23 PM2024-03-22T12:23:36+5:302024-03-22T12:23:58+5:30

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एपीएमसी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ड्रग्ज विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर छापे मारले.

Pistol recovered from APMC along with MD; Police are alert in the wake of the election | एपीएमसीत एमडीसह पिस्तूल केले जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क

एपीएमसीत एमडीसह पिस्तूल केले जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाईसाठी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात. या अंतर्गत बुधवारी रात्री तुर्भे गाव, एपीएमसी, कोपरी परिसरात गुन्हेगारांचे अड्डे, ड्रग्ज विक्रेत्यांच्या अड्ड्यांवर धाडी टाकून संशयित व्यक्तींची, वाहनांची झाडाझडती घेण्यात आली. या एकूण कारवाईत पोलिसांनी ११ लाखांचे एमडी, देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

एकतानगर झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ४४ हजार रुपयांचे एमडी मिळून आले. याप्रकरणी रुना शेख, धनलक्ष्मी स्वामी, रेखा शेख व रुबिना शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर ग्रीन पार्क झोपडपट्टी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ५ लाख ५५ हजार रुपयांचे एमडी मिळाले आहे. याप्रकरणी अकबर शेख, जुगल शेख, दिलीप राठोड, रशिदा शेख व तस्लिमा खातून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • २ तडीपारांवर कारवाई

तडीपार केल्यानंतरही परिसरात वावरणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. एकाकडे तलवार मिळून आल्याने त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनदरम्यान हिस्ट्रीशिटर सराईत गुन्हेगारांची पडताळणी करण्यात आली. तसेच, ४५ वाहनांवर नियम तोडल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

  • तुर्भे रेल्वेस्थानक परिसरातून पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या मतेबुल शेख (३४) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे हस्तगत केली आहेत. 
  • त्याशिवाय एपीएमसी बाजारपेठ परिसरात नशा करणारे व इतर अवैध धंदे चालवणाऱ्यांवर देखील कारवाई केली.
  • या सर्व कारवाया उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे व पथकांनी केल्या.

Web Title: Pistol recovered from APMC along with MD; Police are alert in the wake of the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.