एनएमएमटी बसची सात गाड्यांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:29 AM2018-06-13T04:29:55+5:302018-06-13T04:29:55+5:30

नवीन पनवेल येथील उड्डाणपुलाच्या उतरणीवर एनएमएमटीच्या बसने समोरील सात गाड्यांना मागून धडक दिली. मंगळवारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

NMMT bus hits seven vehicles | एनएमएमटी बसची सात गाड्यांना धडक

एनएमएमटी बसची सात गाड्यांना धडक

Next

पनवेल  - नवीन पनवेल येथील उड्डाणपुलाच्या उतरणीवर एनएमएमटीच्या बसने समोरील सात गाड्यांना मागून धडक दिली. मंगळवारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे या ठिकाणी काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
नवीन पनवेल उड्डाणपुलावरून आसूडगाव डेपोकडे जाणाऱ्या एनएमएमटी बसचा अचानक ब्रेक फेल झाला, त्यामुळे पुढे जाणाºया सात वाहनांना या बसची धडक बसली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली. या वेळी पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत केली.

Web Title: NMMT bus hits seven vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.