अवजड वाहनांच्या पार्र्किं गची डोकेदुखी, वाहतूक पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:22 PM2019-01-21T23:22:23+5:302019-01-21T23:22:27+5:30

वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सध्या पनवेल तसेच नवी मुंबईत तीव्र करण्यात आली आहे.

Neglected headaches of heavy vehicles, neglect of traffic police personnel | अवजड वाहनांच्या पार्र्किं गची डोकेदुखी, वाहतूक पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

अवजड वाहनांच्या पार्र्किं गची डोकेदुखी, वाहतूक पोलिसांचे कारवाईकडे दुर्लक्ष

Next

- वैभव गायकर 
पनवेल : वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मोहीम सध्या पनवेल तसेच नवी मुंबईत तीव्र करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात अनेकांचे परवानेही वाहतूक पोलिसांकडून रद्द करण्यात आले आहे. मात्र महामार्ग तसेच सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या अवजड वाहनांवर कारवाई करण्यास दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.
कळंबोली-मुंब्रा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४ बी, नौपाडा गावाजवळ, तळोजा एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट, मोठा खांदा गाव, तळोजा लिंक रोड, आसूडगाव तसेच पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस सध्याच्या मोठ्या संख्येने अवजड वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रात्रीच्या वेळी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
पनवेल तालुक्यातून मुंबई-गोवा महामार्ग, जेएनपीटी मार्ग, तसेच कळंबोली परिसरातून जाणाºया एक्स्प्रेसवे या मार्गावर अवजड वाहने सर्रास उभी करण्यात येतात. कळंबोली सर्कल याठिकाणाहून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. रात्री तसेच सकाळी ही वाहने नौपाडा, खांदेश्वर स्थानकाजवळ अंतर्गत रस्त्यांवर उभी केली जातात. या वाहनांमध्येच अनेकदा खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज शेकडोंच्या संख्येने उभ्या असलेल्या या वाहनांवर वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच आहे.
तळोजा एमआयडीसी व कळंबोली स्टील मार्केटमध्येही अशीच अवस्था पहायला मिळते. याठिकाणच्या सर्व्हिस रोडवर पूर्णपणे अवजड वाहनांनी कब्जा केला आहे. त्यामुळे शहरांतर्गत वाहतूक खोळंबते. सिग्नल तोडला, हेल्मेट नसेल तर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते, दंड आकारण्यात येतो, मात्र कळंबोली स्टील मार्केट, तळोजा औद्योगिक वसाहत, मुंबई-गोवा महामार्गासह खांदेश्वर येथील जेएनपीटीकडे जाणाºया मार्गावर शेकडोंच्या संख्येने अनधिकृत अवजड वाहने उभी केली जातात. त्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.
अधिक छाया /पान ४
>वाहनांची संख्या वाढली पार्किंग मात्र अपुरेच
गेल्या एक दोन वर्षात पनवेल परिसरात होऊ घातलेले आंतरराष्टÑीय विमानतळ, जेएनपीटी बंदर आदी प्रकल्पांमुळे अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे तळोजा एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट यांच्यामार्फत पार्किंगसाठी आवश्यक भूखंड आरक्षित ठेवले नसल्याने चालकांना अनधिकृतपणे वाहने उभी करावी लागतात.
>याठिकाणी होते अवजड वाहनांचे पार्किंग
कळंबोली-मुंब्रा महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४ बी (नौपाडा गावाजवळ), तळोजा एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट, मोठा खांदा गाव, तळोजा लिंक रोड, आसूडगाव तसेच पोलीस मुख्यालयाच्या मागील बाजूस सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग केल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
>पनवेल महापालिका आणणार जप्ती
पनवेल महापालिकेने नुकताच बेवारस वाहन जप्ती करण्याचा ठराव महासभेत मंजूर केला आहे. अनेक वर्षे एकाच ठिकाणी धूळखात पडलेल्या व रस्ता अडवलेल्या वाहनांवर महापालिका जप्ती आणणार आहे. अनेक दिवस रस्ता अडवून अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर महापालिकेने कारवाई करावी, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Neglected headaches of heavy vehicles, neglect of traffic police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.