नवी मुंबई ते पंढरपूर अनोखी सायकल वारी; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 07:52 PM2018-07-13T19:52:00+5:302018-07-13T19:52:07+5:30

आज संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे कूच करत आहे . विठूच्या भेटीसाठी शेकडो किमीचा प्रवास करत वारकरी संप्रदाय अनेक वर्षांची परंपरा जोपासत आहे .

Navi Mumbai to Pandharpur Cycle wari; Message of environmental conservation | नवी मुंबई ते पंढरपूर अनोखी सायकल वारी; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नवी मुंबई ते पंढरपूर अनोखी सायकल वारी; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Next

- वैभव गायकर

पनवेल : आज संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे कूच करत आहे . विठूच्या भेटीसाठी शेकडो किमीचा प्रवास करत वारकरी संप्रदाय अनेक वर्षांची परंपरा जोपासत आहे . शुक्रवारी नवी मुंबईमधून देखील सायकलस्वार पर्यावरण बचावाचा संदेश  देत  सुमारे ३५० किमीचा प्रवास गाठण्यासाठी सज्ज झाले. खारघर मधून सहा जण पंढरपूर कडे रवाना झाले . 
           झाडे लावा पार्यावरण वाचवा हा संदेश दहा सायकल स्वार पंढरपूर कडे रवाना झाले असून या तरुणांमध्ये पोलीस, वकील तसेच डॉक्टर या उच्चशिक्षित अधिका-यांचा समावेश आहे . शुक्रवारी सकाळी सहा वाजता खारघर येथून सहा जणांचा पथक पंढरपूर कडे रवाना झाला . यामध्ये डॉ अमर भिडे , लाचलुचपत विभागातील कन्हैया थोरात , रवींद्र क्षीरसागर, बाळासाहेब सावंत, अंकुश बांगर, वाल्मिक पाटील, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निलेश थोटे , पोलीस हवालदार गणेश पवार , अनिल गीते , मिलिंद सकपाळ आदींचा समावेश आहे . दहा जणांपैकी चार जण पुण्यात राहत असलयाने पुण्याहून या अनोख्या सायकल स्वारीत सहभागी होणार आहेत . मागील तीन वर्षपासून दहा जण या अनोख्या वारीचे आयोजन करत असतात . या प्रवासादरम्यान ग्रामस्थांमध्ये वृक्षलागवड , पर्यावरण संरक्षण , तसेच प्रकृती स्वास्थाचे धडे देणार आहेत . दोन दिवसात हा २५० किमीचा प्रवास हे दहा जण पार करणार आहेत . विशेष म्हणजे पंढरपूर ला स्थानापन्न झाल्यांनतर विठुरायाच्या चरणी पर्यावरण संरक्षणाची मागणी हे दहा जण करणार आहेत . 
      शासनाच्या विविध खात्यात काम करणारे उच्च पदस्थ अधिकारी , पोलीस अधिकारी , तसेच खाजगी क्षेत्रातील अधिकारी डॉक्टर यांचा व्यस्त कार्यकाळ सर्वानाच माहीत आहे . अशावेळी वेळात वेळ काढून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनोखी वारी करणा-या सर्वाचाच कौतुक केले जात आहे .

Web Title: Navi Mumbai to Pandharpur Cycle wari; Message of environmental conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.