अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:10 AM2018-05-25T04:10:19+5:302018-05-25T04:10:19+5:30

७० फेरीवाल्यांना हटविले : वाशीतील बस डेपो मागे विनापरवाना उभारलेले शेडही काढले

Municipal action against unauthorized hawkers | अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

Next

नवी मुंबई : वाशी बसडेपोजवळील अनधिकृत फेरीवाल्यांवर गुरुवारी महापालिकेने कारवाई केली. येथील ७०पेक्षा जास्त फेरीवाल्यांना हटवून अनधिकृतपणे उभारलेले शेड काढण्यात आले.
नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंडे असताना त्यांनी सेक्टर ९ परिसरातील फेरीवाल्यांचे बसडेपोमागील सायकलपथला लागून स्थलांतर केले होते. रोड व पदपथ अतिक्रमणमुक्त होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता; परंतु नंतर नवीन मार्केटमध्येही अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली व अनेकांनी पूर्वीच्या जागेवर पुन्हा व्यवसाय सुरू केला होता. सायकलपथजवळ ७०पेक्षा जास्त अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यवसाय सुरू केला होता. पावसाळा जवळ आल्यामुळे नवीन शेड बांधण्यास सुरुवात झाली होती.
वाशीमधील विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली. शेडही हटविण्यात आले आहे. या परिसरामध्ये नियमित कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या या धडक
कारवाईमुळे फेरीवाल्यांचे धाबेही दणाणले आहेत.

Web Title: Municipal action against unauthorized hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.