पनवेलमधील मोरबे धरणाला गळती

By Admin | Published: May 5, 2016 01:14 AM2016-05-05T01:14:53+5:302016-05-05T01:14:53+5:30

मोरबे धरणाच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

Morbe dam in Panvel gets leakage | पनवेलमधील मोरबे धरणाला गळती

पनवेलमधील मोरबे धरणाला गळती

googlenewsNext

पनवेल : मोरबे धरणाच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
पनवेल तालुक्यातील खैरवाडी- गारमाळ परिसरात वसलेले हे मोरबे धरण जवळपास ५० एकर जमिनीवर आहे. या धरणाचे पाणी आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांना पिण्यासाठी वापरले जाते. ३.२२ दशलक्ष घनमीटर या धरणाची क्षमता असून ३.१२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असतो. तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने त्रस्त आहेत. सद्यस्थितीत पनवेलमधील ३६ गावे -वाड्यामध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. येथील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे आणि मोरबे धरणातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. कित्येक महिन्यांपासून धरणाच्या दुरु स्तीकडे पाटबंधारे विभाग लक्ष देत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मोरबे धरणात पहिल्यांदाच पिंजरा पालन पद्धतीद्वारे मत्स्यव्यवसाय करण्यात येत आहे. ही पद्धत नवीन असून या मत्स्य प्रकल्पामुळे येथील पाणी प्रदूषित झाले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. धरणातील पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे बाजूला खड्डा खोदून त्यातून पिण्यासाठी पाणी नेता येत नसल्याचे आदिवासी बांधव सांगतात.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या फोडून काचा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. एकंदरीत धरण परिसरात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने धरणाला लागलेली गळती व दुर्गंधी थांबवावी अशी मागणी येथील नागरिक करत आहे. (प्रतिनिधी)

यासंदर्भात अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ते तपासणीसाठी कोलाड व ठाणे येथील कार्यालयात पाठविण्यात आले आहे. त्यानंतरच धरणाच्या दुरु स्तीला सुरुवात करण्यात येईल.
- निकीता महाडिक,
शाखा अभियंता,
पाटबंधारे विभाग, पनवेल

Web Title: Morbe dam in Panvel gets leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.