महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांचा नवी मुंबई महानगरपालिकेकडून सन्मान

By योगेश पिंगळे | Published: March 7, 2024 06:45 PM2024-03-07T18:45:59+5:302024-03-07T18:46:25+5:30

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : आपल्या चतुरस्त्र अभिनयाने नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाहिनी या तिन्ही क्षेत्रात आपली अक्षय ...

Maharashtra Bhushan Ashok Saraf honored by Navi Mumbai Municipal Corporation | महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांचा नवी मुंबई महानगरपालिकेकडून सन्मान

महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांचा नवी मुंबई महानगरपालिकेकडून सन्मान

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : आपल्या चतुरस्त्र अभिनयाने नाट्य, चित्रपट व दूरचित्रवाहिनी या तिन्ही क्षेत्रात आपली अक्षय नाममुद्रा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकतेच महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानीत केले आहे. त्याबद्दल महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच महानगरपालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाट्यप्रयोगाप्रसंगी अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आले.

वयाच्या अठराव्या वर्षी वि.वा.शिरवाडकर लिखित ‘ययाती आणि देवयानी’ नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलेल्या अशोक सराफ यांनी विनोद सादरीकरणाची सहज शैली, परफेक्ट टायमींग आणि कोणत्याही साच्यात न अडकता विनोदी, गंभीर ते अगदी खलनायकी साच्यातील विविधरंगी भूमिकांतून साकारलेल्या अप्रतिम अभिनयामुळे ५० हून अधिक वर्षे मराठी रसिक मनांवर राज्य केले. त्यांच्या या उत्तुंग अभिनय कर्तृत्वाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्यातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा केलेला गौरव सर्वांनाच आनंद देणारा आहे. म्हणूनच नवी मुंबईकर महापालिकेनेही समस्त नवी मुंबईकर कलाप्रेमी रसिक नागरिकांच्या वतीने अभिनंदन करीत त्यांचा सन्मान केला. महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या हस्ते उपआयुक्त मंगला माळवे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथभेट प्रदान करीत नवी मुंबई महागरपालिकेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

Web Title: Maharashtra Bhushan Ashok Saraf honored by Navi Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.