इंदिरानगरचे रहिवासी मृत्यूच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 04:10 AM2018-08-19T04:10:00+5:302018-08-19T04:10:18+5:30

दुर्घटनेची शक्यता; घरांवर विद्युत वाहिन्यांचे जाळे

Indiranagar residents die in the shadow of death | इंदिरानगरचे रहिवासी मृत्यूच्या छायेत

इंदिरानगरचे रहिवासी मृत्यूच्या छायेत

Next

नवी मुंबई : तुर्भेतील इंदिरानगर परिसरातील रहिवासी उपरी विद्युत वाहिन्यांखाली जीव मुठीत घेऊन राहत आहेत. जागोजागी विद्युत वाहिन्यांचे जाळे तयार झाले असून, त्याचा शॉक लागून अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. भविष्यात त्या ठिकाणी एखाद्या छोट्याशा आगीमुळे देखील अग्नितांडव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तुर्भे एमआयडीसी परिसराला लागूनच इंदिरानगर वसाहत निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीला शेकडोच्या वर कुटुंबे त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. त्यापैकी अनेकांनी बैठ्या चाळीतील घरांची पुनर्बांधणी करून एक किंवा दोन मजल्यांची घरे बांधली आहेत. मात्र, वाढत्या बांधकामांमुळे रहिवाशांचेही जीव धोक्यात आले आहेत. जागोजागी असणाऱ्या विजेच्या खांबाला लागूनच बहुतांश घरे आहेत. काही ठिकाणी घरांच्या खिडक्या, दरवाजे यापासून हाताच्या अंतरावर एकत्रित विद्युत वायरची जोडणी झालेली आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीचा अथवा मुलाचा नकळतपणे वायरला स्पर्श झाल्यास त्याचे प्राणदेखील जाऊ शकतात. अनेकदा पावसात विजेच्या खांबामधूनही विजेचा प्रवाह होतो. अशा वेळी तिथे खेळणाºया मुलांचा त्या खांबाला स्पर्श होऊन शॉक लागण्याचे अथवा काही कारणाने उपरी वायर तुटून अंगावर अथवा घरावर पडण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच परिसरात एखादी छोटीशी लागलेली आगदेखील संपूर्ण इंदिरानगर परिसरात अग्नितांडव पसरवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छतांवर मोठ्या प्रमाणात पसरलेले प्लॅस्टिक त्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
पावसाळ्यात घरामध्ये पाणी ठिपकू नये, याकरिता अनेक जण घरांवर प्लॅस्टिक पसरवून टाकतात. या कामा वेळी उपरी विद्युत वाहिनीला नकळत स्पर्श होऊन शॉक लागण्याच्या घटना घडत आहेत. अशा प्रकारांमुळे प्रतिवर्षी दोन ते तीन व्यक्तींचे प्राण जात आहेत. यामुळे संपूर्ण परिसरावर पसरलेले विद्युत वाहिन्यांचे जाळे हटवून उपरी वायर भूमिगत करण्याची मागणीदेखील अनेकांनी केलेली आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून त्याचे फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याने रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

इंदिरानगरमधील उपरी विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यूच्या घटना घडत आहेत. यामुळे तिथल्या वायर भूमिगत करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात खासदार राजन विचारे यांनी वीज वितरणच्या अधिकाºयांना देखील लेखी कळवलेले आहे. त्यानंतरही ठोस पर्याय राबवला जात नसल्याने भविष्यात त्या ठिकाणी मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
- महेश कोटीवाले,
विभागप्रमुख, शिवसेना

Web Title: Indiranagar residents die in the shadow of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.