अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 05:18 AM2018-08-30T05:18:10+5:302018-08-30T05:18:33+5:30

तुटपुंजा अतिकालिक भत्ता : जादा कामासाठी नाका कामगारांपेक्षाही कमी मोबदला

Ignore the problem of firefighters | अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

Next

नामदेव मोरे

नवी मुंबई : शहरातील १४ लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अग्निशमन कर्मचाºयांच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एमआयडीसीसह सिडको आठ तासांच्या ओव्हर टाइमसाठी ९०० ते १२०० रुपये भत्ता देत असताना, नवी मुंबईमध्ये मात्र फक्त १९० रुपये दिले जात आहेत. जादा कामासाठी कंत्राटी व नाका कामगारांपेक्षाही कमी मोबदला दिला जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये ४७५ अधिकारी व कर्मचाºयांची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात १३९ अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून, यामध्ये अग्निशामकांची संख्या फक्त ८५ एवढीच आहे. सद्यस्थितीमध्ये ऐरोली, वाशी, नेरुळ व सीबीडी अशी चार अग्निशमन केंद्रे असून, २४ तास येथील कर्मचाºयांना दक्ष राहावे लागत असते. नियमाप्रमाणे एक अग्निशमन वाहनासाठी एक अधिकारी, एक उपअग्निशमन अधिकारी, प्रमुख अग्निशमन विमोचक, दोन यंत्रचालक व तीन अग्निशामक असे जवळपास १२ कर्मचारी आवश्यक आहेत. केंद्रावरील कार व जिपसाठी दोन कर्मचारी आवश्यक असतात. तीन शिफ्टमध्ये काम चालत असल्यामुळे एका गाडीसाठी २४ तासांमध्ये ३६ व कार व जिपसाठी सहा कर्मचाºयांची आवश्यकता आहे; पण मनपाकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे कामगारांना जादा काम करावे लागत आहे. जादा कामासाठी अत्यंत तुटपुंजा मोबदला दिला जात आहे. आठ तास जादा काम केल्यानंतर १९० रुपये भत्ता दिला जातो. नाशिकमध्ये ९११, सिडकोमध्ये १२४२, एमआयडीसीमध्ये याच कामासाठी ९११ रुपये दिले जात आहेत.
नवी मुंबई राज्यातील श्रीमंत महानगरपालिका असून, शहराच्या सुरक्षेचे महत्त्वाचे काम करणाºया अग्निशमन कर्मचाºयांना जादा कामाचा भत्ता देण्यास का कंजुसी केली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दिघा ते सीबीडीपर्यंत पसरलेल्या नागरी वसाहती, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आग विझविण्याचे काम मनपाचे कर्मचारी करत आहेत. याबरोबर शहरात वृक्ष कोसळणे, अपघात व इतर दुर्घटनांमध्ये मदतीसाठी अग्निशमन दलाचे जवान धावपळ करत असतात.
पक्षी अडकल्यापासून नागरी वस्तीमध्ये साप आढळला तरी अग्निशमन कर्मचाºयांना बोलावण्यात येते. स्वत:चा जीव धोक्यात घालून शहरवासीयांना मदत करणाºया या अग्निशमन कर्मचाºयांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अग्निशमन कर्मचाºयांना ओव्हर टाइम मोबदला मिळावा, यासाठी प्रस्ताव तयार करून तो प्रशासन विभागाकडे पाठविला आहे. हा विषय निर्णय प्रक्रियेमध्ये असून, प्रशासन विभागाच्या मंजुरीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
- रवींद्र पाटील,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका

न्याय मिळावा
महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी यापूर्वी ठोक मानधनावरील शिक्षक, कंत्राटी कामगार, शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी सेविका, मदतनीस यांना वेतनवाढ व प्रलंबित देणी देऊन न्याय मिळवून दिला आहे. अग्निशमन कर्मचाºयांनाही न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Ignore the problem of firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.