उरणमधील आरोग्य सेवा ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 02:25 AM2017-08-17T02:25:54+5:302017-08-17T02:25:57+5:30

उरण परिसरातील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुरती ढासळली आहे.

Health services in Uran deteriorated | उरणमधील आरोग्य सेवा ढासळली

उरणमधील आरोग्य सेवा ढासळली

Next

मधुकर ठाकुर ।
उरण : डॉक्टर, कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे गरिबांसाठी उभारण्यात आलेले उरण परिसरातील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सेवा पुरती ढासळली आहे. या ढासळत्या आरोग्य सेवेमुळे गरीब-गरजू रुग्णांची प्रचंड हेळसांड होऊ लागल्याने गरीब रुग्णांना उपचारही मिळणे कठीण झाले आहे. इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकच आजारी असल्याने रुग्णालयच सध्या आजारी झाले आहे.
गरिबांना अल्पदरात वैद्यकीय सेवा देण्यासाठी उरण शहरात इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. दररोज २५०-३०० बाह्य रुग्णांची तपासणी केली जाते. वैद्यकीय अधीक्षक आणि एक प्रशिक्षित डॉक्टर सध्या रुग्णालयात नियुक्त आहेत. उर्वरित पदे रिक्तच आहेत. इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा सांभाळणारे वैद्यकीय अधीक्षकच मागील दहा दिवसांपासून आजारी असल्याने रजेवर आहेत. त्यामुळे रुग्णालयाचा ताण सध्या एकाच उपलब्ध असलेल्या प्रशिक्षित डॉक्टरांवर येऊन पडला असल्याची माहिती इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय सूत्रांनी दिली. मात्र दररोज येणाºया बाह्य रुग्णांची संख्या सुमारे ३०० च्या आसपास असल्याने उपचारासाठी येणाºया गरीब-गरजू रुग्णांना सध्या उपचार मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे परवडत नसतानाही शेकडो गरीब-गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
सध्या कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी वारंवार रुग्णालयात गैरहजर राहात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राचीही अवस्था रुग्णांसाठी गंभीर बनली आहे. याप्रकरणी मनसेचे रुपेश पाटील आणि तालुका उपाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा, तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
सध्या पावसाळ्यात अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आहे. तसेच ग्रामीण भागातून सर्पदंश, विंचूदंश, श्वानदंशाच्या रुग्णातही वाढ होत आहे. मात्र सध्या तरी गरीब-गरजूंसाठी असलेले इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे वेळेवर उपचार मिळत नाहीत.
याकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याने उरण परिसरातील गरीब-गरजू रुग्णांना सध्या तरी कुणीही वालीच उरला नसल्याची संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
<उरण परिसरातील ग्रामीण भागातील गरीब-गरजू रुग्णांसाठी असलेल्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्थाही गंभीर आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधीक्षक १, वैद्यकीय अधिकारी २, ज्युनिअर क्लार्क १, सफाई कामगार २, प्रयोगशाळा सहाय्यक १ आणि कक्ष सेवक १ अशी पदे रिक्त असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
>उरणमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. तीन एमबीबीएस डॉक्टर आणि मेडिकल सुप्रिडेन्टची गरज आहे. इतर पदे भरण्याची मागणी के ली आहे.सध्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकच आजारी असल्याने ते रजेवर आहेत.
- डॉ.अजित गवळी,
जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Health services in Uran deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.