झिरो गार्बेजच्या ठरावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 02:51 AM2017-10-22T02:51:57+5:302017-10-22T02:52:02+5:30

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून, सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

General Meeting Approval for Zero Garbage Resolution | झिरो गार्बेजच्या ठरावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी

झिरो गार्बेजच्या ठरावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी

Next

वैभव गायकर 
पनवेल : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात स्वच्छतेबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत असून, सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधींमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर पनवेल महापालिकेने झिरो गार्बेज संकल्पना राबविण्याचा निश्चय केला असून याकरिता नुकताच याबाबतचा ठराव पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आला.
सद्यस्थितीत घनकचरा व्यवस्थापन ही पालिकेसह सर्वच व्यवस्थापनाला न झेपणारी अशी बाब आहे. याकरिता लागणारे मनुष्यबळ तसेच आर्थिक बाजूचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक भार हा संबंधित प्रशासनाच्या तिजोरीवर पडत असतो आहे. यासंदर्भात योग्य नियोजन व जनजागृती केल्यास घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. या गोष्टीला पर्याय म्हणून झिरो गार्बेज संकल्पना पुढे आली आहे. नुकताच पनवेल महापालिकेनेही यासंदर्भात ठराव मंजूर करून स्वच्छतेच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या कुंड्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता निर्माण होतेच, त्याचबरोबर रहदारीलाही अडथळा निर्माण होतो. घनकचरा व्यवस्थापनात हा एक प्रकारे अडथळा आहे. त्यामुळे आगामी काळात पनवेल महापालिका कचराकुंड्यामुक्त करण्याचा संकल्प प्रशासनाचा आहे.
पनवेल शहरात ओल्या-सुक्या कचºयाचे वर्गीकरण करण्यात येत नाही. एकंदरच महापालिका क्षेत्रात या कचराकुंड्या व्यवस्थापन बिघडत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन सुरू आहे. त्याकरिता मायक्र ो प्लानिंग सुरू असून, कचराकुंड्यांना थारा देण्यात आला नसल्याचे समजते. ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरणाची सवय सोसायट्यांना लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर ओला कचरा त्याच ठिकाणी जिरविण्याचे नियोजनसुद्धा सुरू आहे. तसेच यासंदर्भात झिरो गार्बेज या संकल्पनेनुसार पालिकेने ठराव मंजूर केल्याने घनकचरा व्यवस्थापनाला गती प्राप्त होणार आहे. यासंदर्भात पनवेल महापालिकेचे नगरसेवक हरेश केणी यांनी सर्वप्रथम सभागृहात आवाज उठवला होता. झिरो गार्बेज संकल्पनेनुसार त्यांनी तळोजा फेज वनमध्ये पहिल्यांदा संकल्पना राबविली आहे.
घनकचरामुक्त तळोजा शहर ही मोहीम ते सध्या राबवत असून, त्याच धर्तीवर पालिकेने केलेला झिरो गार्बेजचा ठराव महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
>काय आहे झिरो
गार्बेज संकल्पना
कचरा ज्या ठिकाणी निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्या कचºयाचे विघटन करणे म्हणजेच झिरो गार्बेज. या व्यतिरिक्त ओल्या, सुक्या कचºयाचे एकाच जागेवर वर्गीकरण केल्यास पुढील घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया सोपी होते.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पाहणी दौºयाची मागणी
कोकणातील वेंगुर्ले नगरपरिषदेने झिरो गार्बेज ही संकल्पना सत्यात उतरवली आहे. कचºयापासून मिथेन, विविध प्रकारची खते, बायोगॅस, प्लास्टिकपासून रस्ते अशा प्रकारच्या अनेक संकल्पना नगरपरिषदेने सत्यात उतरविल्या आहेत.
याच धर्तीवर पनवेल शहराचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांचा वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत अभ्यास दौरा आयोजित करण्याची मागणी शेकाप नगरसेवक हरेश केणी यांनी पालिकेकडे केली आहे.
>झिरो गार्बेज संकल्पना ही स्वच्छ भारत अभियानाचाच एक भाग आहे. याकरिता महापालिका विविध उपाययोजना राबविणार आहे. पालिका हद्दीतील नागरिकांनी याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात आपल्या सवयीत बदल करणे गरजेचे आहे. आपला परिसर स्वच्छ, सुंदर होण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावल्यास झिरो गार्बेज संकल्पना सत्यात उतरेल.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त,
पनवेल महानगरपालिका

Web Title: General Meeting Approval for Zero Garbage Resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.