नवी मुंबई - वाशी येथे असलेल्या अरूणाचल प्रदेश भवनाला आग लागल्याचं वृत्त आहे. आज दुपारी अचानक येथे आग लागल्याची माहिती आहे.  अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इमारतीच्या नवव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. त्यानंतर आग पसरून वरच्या मजल्यांवर आग पसरली आहे. नेमकी आग कशी लागली याबाबत अजूनपर्यंत माहिती मिळालेली नाही मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
(सविस्तर वृत्त लवकरच)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.