प्रदूषण पसरविणा-या कारखान्यांविरोधात एल्गार, प्रदूषण न थांबविल्यास अधिका-यांवर कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:48 AM2017-11-22T02:48:32+5:302017-11-22T02:48:41+5:30

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील कारखाने विष ओकत आहेत. रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नाल्यात सोडण्यात येत आहे.

Elgar against factories spreading pollution, warning of action against officials if no pollution is stopped | प्रदूषण पसरविणा-या कारखान्यांविरोधात एल्गार, प्रदूषण न थांबविल्यास अधिका-यांवर कारवाईचा इशारा

प्रदूषण पसरविणा-या कारखान्यांविरोधात एल्गार, प्रदूषण न थांबविल्यास अधिका-यांवर कारवाईचा इशारा

Next

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील कारखाने विष ओकत आहेत. रसायनमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नाल्यात सोडण्यात येत आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून विविध गंभीर आजार होत आहेत. ४ डिसेंबरपर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा, अन्यथा आम्ही प्रदूषण पसरविणाºयांचा अहवाल तयार करून त्यांना पाठिशी घालणाºयांवर कारवाई करण्यास शासनाला भाग पाडू, असा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे.
नवी मुंबईमध्ये प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जात नाही. एमआयडीसीमध्ये जवळपास ५० एमएलडीपेक्षा जास्त पाणी कारखान्यांमधून निघत आहे. परंतु फक्त २५ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करता येईल एवढ्याच क्षमतेचे मलप्रक्रिया केंद्र उपलब्ध आहे. तुर्भे व शिरवणे परिसरातील रासायनिक पाणी तुर्भेमधील साठवण टाकीमध्ये साठवून ते पंपिंग करून पावणेमध्ये आणले जाते. ही सर्व प्रक्रिया योग्यपद्धतीने होत नसून दूषित पाणी नाल्यात सोडले जात आहे. यामुळे महापे, पावणे, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर व इतर ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार संदीप नाईक यांनी मंगळवारी पाहणी दौºयाचे आयोजन केले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना धारेवर धरले. औद्योगिक वसाहतीमध्ये ३५०० पेक्षा जास्त कारखाने आहेत. यामधील किती कारखाने प्रदूषण करत आहेत. जास्त प्रदूषण करणारे कारखाने कोणते, कमी प्रदूषण करणारे कोणते याविषयी कोणताही अहवाल प्रशासनाकडे नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. आरोग्य समिती सभापती दिव्या गायकवाड यांनी प्रदूषण पसरविणाºया कंपन्यांची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली होती. परंतु त्यामधील एकच कंपनी प्रदूषण करत असल्याचा अहवाल संबंधितांनी दिला. यामुळे एमपीसीबीचे अधिकारी व कर्मचारीच प्रदूषणाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करण्यात आला.
प्रदूषणामुळे नवी मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होवू लागला आहे. क्षयरूग्णांची संख्या वाढली आहे. घशाचे आजार व कॅन्सरच्या रूग्णांमध्येही वाढ होत आहे. मागील तीन वर्षात नवीन केमिकल कंपन्याही सुरू करण्यात आल्या असल्याने हे प्रकार होत आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून आम्ही तो होवू देणार नाही. ४ डिसेंबरपर्यंत प्रदूषण पसरविणाºया कंपन्यांची यादी तयार करण्यात यावी. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही स्वत: प्रदूषणाचे नमुने घेवून शासनाकडे तक्रारी करून व अधिकाºयांवरही कारवाईची मागणी करू असा इशारा नाईक यांनी दिला. यावेळी नगरसेवक मुनावर पटेल, मनीषा भोईर, चंद्रकांत पाटील, वैभव गायकवाड, शशिकांत भोईर, एपीसीबीचे तानाजी यादव, केतन पाटील, उदय यादव, उमेश जाधव उपस्थित होते.
>कारखान्यांमुळे नवी मुंबईतील प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. श्वसनाचे व इतर गंभीर आजार होवू लागले आहेत. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणाºयांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी. कारवाईसाठी प्रशासनाला ४ डिसेंबरची डेडलाइन दिली असून प्रदूषण करणाºयांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवरच कारवाई केली जाईल.
- संदीप नाईक,
आमदार, राष्ट्रवादी काँगे्रस
>एमआयडीसीतील अनेक कारखाने प्रदूषण वाढवत आहेत. अशा कारखान्यांची यादी आम्ही एमपीसीबीला दिली आहे. परंतु संंबंधित प्रशासनाने काहीही कारवाई केली नसल्यामुळे पाहणी दौरा आयोजित केला. प्रशासनाने कारवाई केली नाही तर वेळ पडल्यास आंदोलन केले जाईल.
- दिव्या गायकवाड,
सभापती
आरोग्य समिती

Web Title: Elgar against factories spreading pollution, warning of action against officials if no pollution is stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.